महाराष्ट्र

राजकीय “इज्जत” गमावलेला माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाइल नंबर 9890299499

महाराष्ट्राच्या राजकारणातील “सभ्यता” वेशीवर टांगणारा आणि खोटे हास्य चेहऱ्यावर आणत राजकारणातील भल्या माणसांना शरमेने मान खाली घालाय लावणारा माणूस म्हणुन फडणवीस ह्यांची ओळख निर्माण झाली आहे…

आणखी एक म्हणजे ह्या माणसाला “लोकनेते” असलेले राजकारणी तर अजिबात चालत नाहीत,फडणविस ह्यांच्या हेकेखोर स्वभावाने अनेक राजकारणी घरी बसले हे ह्यांनी कबूल करावे…

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारखे पक्ष फोडून ह्या माणसाने स्वतःच आपली राजकीय इज्जत घालवली हे हि तितकेच खरे…

महाराष्ट्रातल्या 48 पैकी 2/3 जागाच इकडे तिकडे होतील हा फडणवीस यांचा अंदाज evm मशीन च्या जीवावरच आहे की काय असे जनताच आता म्हणु लागली आहे…

अनेक ठिकाणी रडी चा डाव खेळून हि सर्व सामान्य जनता हि ह्या निवडणुकीत भाजपा विरोधी च राहिली…
एखाद्या मतदार संघात भाजपा च्या विरुद्ध असणारा उमेदवार वरचड झाला हे ह्यांच्या ध्यानात आले नंतर “हिंदुत्व” सारख्या ज्वलंत विषयात हात घालत तेथील वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न देखील ह्या लोकांनी केला हे आपण नाकारू शकत नाही…

परंतु ह्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीत जनता मात्र यांच्या कडे नव्हतीच,मुस्लिम बहुल मतदार संघात तर ह्यांच्या काही उमेदवारांनी जातीवादी चे कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेने यांना सपशेल नाकारले असुन हे काही दिवसातच समोर येईल आणि यांचा भ्रमाचा भोपळा फुटेल हे नक्की…

तसे पहायला गेले तर शेकाप चे भाई जयंत पाटील यांनी माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीच्या पेचप्रसंगा वरून अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या “शिवरत्न” या निवासस्थानी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना असे बोलले होते की,महाराष्ट्राच्या राजकारणाची “दिशा” बदलण्याची ताकत हि मोहिते पाटील यांच्या मध्ये आहे आणि झाले हि तसेच मोहिते पाटील यांनी फडणवीस यांच्या कसल्याही दबावाला बळी न पडता आणि माढा लोकसभा मतदार संघातील “जनभावने”चा आदर करत आपली उमेदवारी कायम ठेवली आणि मोहिते पाटील यांनी हि निवडणुक कार्यकर्ते आणि जनतेच्या भरोष्यावर पार पाडत अनेकांची मने हि जिंकली…

तद्नंतर मतदानाच्या काही दिवसांनी फडणवीस यांनी गलिच्छ राजकारण करत निरा उजवा कालवा हा दुरुस्तीच्या नावाखाली बंद करून शेतकऱ्यांची चेष्टा च केली…

“लोकनेते” असलेले स्व गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे हे बीड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असताना महाराष्ट्राच्या भाजपा चे प्रमुख “जिम्मेदार” म्हणुन फडणवीस यांनी बीड ला एकदा तरी जाणे आवश्यक होते परंतु जाती चे गणिते आपल्या बरोबर आहेत हे सांगत बीड इथे जाणे टाळले…
परंतु असे घाणेरडे राजकारण जनताच आता खपवून घेणार नाही आणि फडणवीस यांच्या थापांना बळी पडणार नाहीत…

श्रीकांत भारतीय,गोपीचंद पडळकर,निलेश राणे,मोहित कंबोज आणि चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या भाजपा नेत्यांना फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा साठी हिमालयात पाठवले होते की काय असे जनताच म्हणु लागली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button