“मी धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील अशी शपथ घेतो की”

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाइल नंबर 9890299499
आत्ता पर्यंत लोकसभेच्या चार टप्प्यातील मतदान पार पडले,हे मतदान झाले नंतर अनेक ठिकाणच्या उमेदवारांनी आप आपले देव पाण्यात ठेवले परंतु 43 माढा लोकसभा मतदार संघात जी स्वाभिमानाची लढाई पार पडली त्या मध्ये फक्त धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाची औपचारिकता च बाकी असुन माढा लोकसभा मतदार संघातील तमाम जनता हि फक्त 4 जून चीच वाट पाहत आहेत…
महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक प्रकांड पंडितांनी काही जागे बद्दल आप आपले मत नोंदवत असताना माढा लोकसभा मतदार संघात झालेली निवडणुक हि न भुतो न भविष्यती अशीच झाल्याची कबुली हि दिली,हि निवडणुक जनतेने अक्षरशः स्वाभिमानाने हाती घेत लादलेला उमेदवार विरुद्ध कंटाळलेली जनता अशीच झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे…

तिसऱ्या टप्प्यातच माढा लोकसभेचे मतदान पार पडले असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत चौथ्या टप्प्यातील जागेसाठी आपली जिथे जिथे गरज आहे तिथे जातीने उपस्थित राहत तेथील प्रचार यंत्रणेत सहभाग घेत होते…
यात आणखी भर पडली ती निरा उजवा कालवा दुरुस्तीच्या नावाखाली खुनशी फडणवीस यांनी भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांचा घसा कोरडा ठेवण्याचे पाप केल्याचे… अशा परिस्थीतीत हि “अजात शत्रु” विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथे तो कालवा लवकरात लवकर दुरुस्त होऊन योग्य पद्धतीने सुरु करणेसाठी केलेल्या आंदोलनात सहभाग होत शेतकऱ्यांचा जिवाभावाचा प्रश्न धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोडवला…
म्हणूनच येत्या 4 जून नंतर 19 व्या लोकसभेत ज्या वेळेस लोकसभेच्या नव्या खासदारांचे सत्र आयोजित केले जाईल त्या वेळी “सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून मी धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील” अशी शपथ घेतो की,हे स्वाभिमानी वाक्य ऐकण्यासाठी माढा लोकसभा मतदार संघा सह महाराष्ट्रातील जनता आसुसलेली आहे हे मात्र तितकेच खरे …