सफाळे विटी लाईन रस्त्यावर अपघात करून पळून जाणाऱ्या एल एन टी कंपनीच्या बोलेरो गाडी चालकाला त्वरित अटक करून केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी केला गुन्हा दाखल
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील विटी लाईन रस्त्यावर झालेल्या बोलेरो गाडी आणि मोटरसायकलच्या अपघातात जलसार गावातील ज्येष्ठ नागरिकासह एक रेल्वे कर्मचारी असे दोन जण जबरी जखमी झाले आहेत. हा अपघात करून फरार झालेल्या बोलेरो गाडीच्या चालकाला त्वरित अटक करून केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी या चालकाविरुद्ध केळवा सागरी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करून ही बोलेरो गाडी जप्त केली आहे.
सफाळे जलसार गावातील रेल्वे कर्मचारी सुभाष भोईर वय वर्ष (59) आणि रेल्वे निवृत्त कर्मचारी ज्ञानेश्वर भोईर वय वर्ष (63 )हे दोघेजण मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास MH-04-ER -5416 या दुचाकी वर बसून विटी लाईन रस्त्याने सफाळे दिशेने जात असताना त्यांची मोटरसायकल पाटील पाडा गावाजवळ आल्यावर किरईपाडा इथून बुलेट ट्रेनचे काम चालू असलेल्या एल एन टी कंपनीची चॉकलेटी कलरची राजस्थान पासिंगची RJ-41-GA-7361 असा नंबर असलली बोलेरो गाडी घेऊन कमलेश गुजर राहणार राजस्थान हा ड्रायव्हर ही बोलोरो घेऊन एल एन टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणण्यासाठी सफाळे दिशेने जात होता.
त्यांनी ही गाडी विरुद्ध दिशेने आणल्यामुळे मेन रस्त्यावरून सरळ जाणाऱ्या दुचाकी स्वारांना जबरी ठोकर दिल्यामुळे या दुचाकी वर बसलेले सुभाष भोईर यांच्या डोक्याला आणि ज्ञानेश्वर भोईर यांच्या पायाला जबरी दुखापत झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी माकणे येथील स्वास्थम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात करून फरार झालेल्या एल एनटी कंपनीच्या बोलेरो गाडीच्या ड्रायव्हरला त्वरित अटक करून केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी गुन्हा दाखल करून ही बोलेरो गाडी केळवा पोलीस ठाण्यात जमा केली आहे.