महाराष्ट्र

विजयसिंह मोहिते पाटील हेच जनतेचे खरे “राम”…

विशेष प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज

“अजातशत्रु” विजयसिंह मोहिते पाटील ह्यांनी अकलूज च्या सरपंच पदापासून ते 2014 च्या मोदी लाटे पर्यंत आणि माळशिरस तालुक्याचे आमदार म्हणून काम करत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारत वेगवेगळी खाती सांभाळताना कधीच सत्तेचा गैरवापर होऊ दिला नाही आजसुध्दा महाराष्ट्रात निष्कलंक राजकीय नेत्यांमध्ये विजयदादांचे नाव तितक्याच आदराने घेतले जाते महाराष्ट्राच्या पाठीवर माळशिरसचा नावलौकिक झाला तो “अजातशत्रू” विजयदादा यांच्यामुळेच…

संयमी राजकारण करत असताना प्रशासनावर त्यांचा दबदबा कायम राहिला हे वास्तव आमच्या सह उभ्या महाराष्ट्राने हि पाहिला आणि त्यानंतर 2009 साली माळशिरस तालुका हा राखीव झाला…

2009 व 2014 दोन टर्म हनुमंत डोळस यांनी विजय दादांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे नेतृत्व केले हनुमंत डोळस यांनी देखील 10 वर्षात रामभक्त हनुमानाची भुमिका पार पाडत बेरजेचे राजकारण करणारे विजयसिंह मोहिते पाटील या नावाला कुठेच डाग लागू दिला नाही…

आजची परिस्थिती पाहता नुसत्या नावाने राम असलेल्या आमदाराने निर्लज्ज पणाचे अक्षरशः कळस गाठले आहे,भाजपा ने माळशिरस तालुक्यावर लादलेला आमदार किती खालच्या पातळीचा असू शकतो हे आज अवघा महाराष्ट्र पहातोय…

ऊस तोड कामगाराचा मुलगा म्हणुन सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळाल्या नंतर सोलापूर च्या प्रश्नांची कसलीही माहिती नसणाऱ्या राम सातपुते यांनी हिंदु मुस्लीम कार्ड खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत एवढे मात्र खरे…

माळशिरस तालुक्यात मानेंच्या धर्माला बोलणारा राम सातपुते सोलापूर लोकसभेत मात्र फक्त “धर्मा” वरच बोलत आहे,पराभव समोर दिसत असताना भाजपा च्या भात्यातील स्पेशल रडीचा डाव खेळून सोलापूरची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे,या उलट प्रतिस्पर्धी उमेदवार प्रणिती शिंदे ह्या विमानतळ, आयटी पार्क,लोडशेडींग,दुष्काळ,शेतकऱ्यांचे प्रश्न या सह गेली दहा वर्षाचा राहिलेला विकासाचा बॅकलॉग यावर बोलताना दिसत असून राम सातपुते हे फक्त हिंदू मुस्लिम ह्या कळीच्या मुद्यावर बोलत आहेत अशाने दोन समाजात तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजायचा त्यांचा भोळा प्रयत्न दिसतोय,गेल्या काही दिवसापासून प्रचार अगदी शिगेला पोहोचला असताना सुध्दा राम सातपुते विकासा बद्दल एक चकार शब्द ही काढायला तयार नाहीत…

काल तर राम सातपुते यांनी मूर्ख पणाचा कळसच गाठला योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत आपल्या तोंडून जातीवादी चे अफाट दर्शन च सोलापूरकरांना दिले…

2014 ला मोदी लाटेत शरद बनसोडे यांनी आणि 2019 मध्ये कुण्या एका महाराजाने सोलापूरकरांना विकासापासून झुलवत ठेवले,गेली दहा वर्षे सोलापूर हा भाजपा च्या अंतर्गत बंडाळी ने नुसता ग्रासून गेला असुन ह्याला जबाबदार एकाच आडनावाची दोन आमदार आहेत असे जनतेतून बोलले जात आहे…

ऊस तोड कामगाराचा मुलगा “फॉर्चूनर” सारख्या महागड्या गाडीत येऊन जर सोलापूरकरांनी मला सालगडी म्हणुन कामाला ठेवावे अशी भाषा करत असेल तर सोलापूरकर हि तेवढे भोळे नाहीत हे राम सातपुते यांनी लक्षात ठेवावे…

माळशिरस तालुक्यात विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शब्दा खातर तेथील जनतेने एका रात्रीत आमदार केलेल्या राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेची निवडणूक वाटते तितकी सोपी नाहीये…

हे सर्व पहात असताना असे वाटते की,राम सातपुते यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारखे राजकारण, समाजकारण करण्याचा प्रयत्न सुध्दा करू नये कारण “जनसेवा” करायची दानत हि रक्ता मध्येच असावी लागते,पाच पन्नास गरजू रुग्णांची सेवा केल्याने कोणी “आरोग्यदूत” होत नसतो हे हि ध्यानात ठेवावे…
एक अकलूजकर म्हणुन आम्हाला राम सातपुते यांना एवढेच सांगणे आहे की,माळशिरसचे आमदार म्हणून आमचे नाव तेवढे मातीत घालू नका म्हणजे झालं…
आणखी बरेच काही आहे बोलायचे तुर्तास इतकेच…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button