महाराष्ट्रात नेमकं घडतंय काय…?

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाइल नंबर 9890299499
देवेंद्र फडणवीस ह्यांचा रोल आता जवळ जवळ संपत आला आहे ह्यांनी आता चींगाट नागपूर गाठावे…
ज्या RSS च्या जीवावर हे लढत होते तेच आता फुटीरवादी झाले आहेत…
ज्या ज्या वेळी देवेंद्र फडणवीस हे पत्रकारांना स्टेटमेंट देत असतात त्या वेळी ते हि जरा खुनशीच वाटतात…
ह्या निवडणुकीनंतर हेच देवेंद्र फडणवीस नैराश्यतेच्या गर्तेत जातील असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे आणि निवडणुकीनंतर राज्यात अनेक ठिकाणी चिंतन शिबीरे आयोजित करावे लागतील असे सध्या तरी वाटत आहे…
आमच्या इकडे तर BJP वाले च “तुतारी” फुंकण्याच्या तयारीत आहेत…
प्रत्येक निवडणुकीत BJP वाले रामाचं बोलतात ते त्यांनी जरूर बोलावं आणि नंतर कामाचं ही बोलावं असे जनतेला वाटत आहे…
निवडणुका आल्या की धर्म संकटात असतो तो इतर वेळी नसतो ह्याची हि BJP वाल्यांनी ED मार्फत का होईना पण चौकशी जरूर करावी असे तमाम जनतेचे म्हणणे आहे…
जनता अजुन हि पुलवामा कसं घडल ह्या सस्पेंस मध्ये कायम आहे,400KG स्फोटके तिथं कशी आली याचा उलगडा व्हावा म्हणजे 400 जागा यायला काही हरकत नाही असे जनता समजेल…
ऐन निवडणुकीत काही ठिकाणी BJP ने ED सारख्या संस्थेला हाताशी धरून ब्लॅक मेलिंग चे धंदे सुरू केले असुन यामुळे झाले असे की BJP च्या विरुद्ध असलेले महाविकास आघाडी चे धैर्यशील मोहिते पाटील यांना आपोआपच सहानुभूती मिळत आहे…
तिकडे सोलापूर लोकसभेत तर राम सातपुते हे धर्मा शिवाय काहीही बोलायला तयार नाहीत यामुळे तेथील जनता संभ्रमात आहे,एक तर गेली दहा वर्षे सोलापुरातील जनतेला विकास दिसला नाही आणि ह्यांनी धर्माचा आधार घेतल्यामुळे निवडणुक हि मुळ मुद्द्यापासून लांब होत चालली आहे…
प्रत्येक निवडणुकीत जर धर्म संकटात सापडत असेल तर खरोखर च हि अवघड गोष्ट आहे…
बोलायसारखं बरेच काही आहे तुर्तास इतकेच…



