विशेष

माळीनगर येथील हज उमराहासाठी निघालेल्या महिलांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सन्मान सोहळा संपन्न

प्रतिनिधी… रियाज मुलाणीटाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्कमो 99 21 500 780

मुस्लिम धर्मामध्ये हज यात्रा करणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते परंतु ते पूर्ण होणे प्रत्येकाच्या नशिबी नसते आणि त्यामुळे अनेक मुस्लिम समाज बांधव हे हज उमराह करण्यासाठी प्रयत्न करत असतात, ते करण्यासाठी देखील अनेक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते अशाच प्रतीक्षेनंतर माळीनगर मुस्लिम

समाजातील काही महिला स्वतःच्या कष्टाच्या जोरावरती हज उमरा करण्यासाठी निघाले असता मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी हज उमराह साठी निघालेल्या दिलशाद मजीद सय्यद, हवाबी कासिम मुलाणी, राबिया रसूल तांबोळी, शमा सलीम मुजावर, सुगराबी बादशाह शेख, यांचा सन्मान माळीनगर ग्रामपंचायत सदस्य असमा मुलाणी, अरिफा तांबोळी, शाकिरा शेख, सोफिया काझी,नाहिद मुलाणी, नगमा तांबोळी, यांच्या हस्ते ओढणी व हार देऊन करण्यात आला. यावेळी मुस्लिम समाज बांधव व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button