महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्याला नेमकं झालंय तरी काय…

आमीर मोहोळकर
प्रतिनीधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499

सहकाराच्या कुशीत तयार झालेल्या आणि कधी काळी मुंबई सारख्या शहरा सारख गिरणी कामगारांच शहर असलेल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सोन्याचा धुर निघत असे,सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे दोघे हि ज्या वेळेस राज्याच्या राजकारणात सक्रिय होते त्या वेळी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि डझन भर खात्याचे मंत्री सबंध जिल्हयात वावरताना आपण सर्वांनी पाहिले…

सोलापूर जिल्ह्यातील याच “दो हंसो का जोडा” ने विकासाच जाळ आणि धूर काढत सोलापूरच्या विकासाची गाडी अगदी सुसाट पळविली होती,फक्त निवडणूकी पुरते राजकारण एवढेच धोरण असलेल्या सोलापूर जिल्ह्याला कुणाची नजर लागली हे कळायला मार्ग नाही…

आता तर सोलापूर जिल्ह्यात एकाच पक्षाची 7 आमदार 2 खासदार तरी हि जिल्हा “पालकमंत्री” या पदापासून दूर,लोकसभेच्या या रणधुमाळीत दोन्ही हि उमेदवार हे दुसऱ्या जिल्ह्यातले हे बघुन असे वाटते की येथील लोकांनी आपला स्वाभिमान “नागपूर” ला तर गहाण ठेवला नाहीये ना…

मित्रांनो हि काय अभिमानाची गोष्ट नाहीये जे मी तुम्हाला सांगत बसलोय,पण हि धोक्याची घंटा मात्र जरूर आहे,आपण वेळीच सावध झालेले बरे नाही तर येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात सुद्धा बाहेरून आलेल्या आयात उमेदवारांना निवडून द्यायची वेळ येईल यात मात्र शंका नाही…

येथून पुढच्या काळात जर असेच राजकारण होत राहिले तर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही हे त्रिवार सत्य जोपासत जसे चाललय तसे चालु राहिल्यास एक दिवस आपल्या जिल्ह्यावर भयंकर परिस्थिती आल्या शिवाय राहणार नाही हे हि तेवढेच खरे…
बाकी आपली मर्जी…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button