खऱ्याच खोटं लबाडाच त्वांड मोठ ,,,,,,, !पंढरपूर लोणंद रेल्वे ते नीरा देवघर पर्यंतचा सत्य इतिहास ,,,,,,!

ॲड अविनाश टी काले , अकलूज
मो नं:- 9960178213
सर्वाधिक निष्क्रिय खासदार म्हणून माढा लोकसभा मतदार संघातील खा रणजितसिंह निंबाळकर यांचा उल्लेख करता येईल .निवडून आल्या नंतर त्यांनी 5वर्षात मतदार संघाकडे ना फिरकले त्यामुळे त्यांचे दर्शन ही अनेकांना झालेच नाही .पण अश्या निष्क्रिय खासदारांचे ही मार्केटिंग कसे करावे ते भारतीय जनता पक्षाचे कडून शिकून घ्यावे सोशल मीडियावर भाजपा आय टी सेल चे पगारी लोक बसवलेले आहेत आणि स्वतः ची ओळख लपवून दमदार आणि पाणीदार अशी विशेषणे बहाल करून ते फारच क्रियाशील आहेत आणि 40वर्षात असा खासदार कुणालाच प्राप्त झाला नाही व या पुढे ही होणार नाही असा प्रचार सातत्याने केला गेल्याने खरा इतिहास दडवून खोटा प्रचार कसा केला जातो हे पाहण्यासाठी आपणास हा लेख संपूर्ण वाचावाच लागेल .

1 ),,,,,,,,,,
पंढरपूर लोणंद रेल्वे
~~~~~~~~
ब्रिटिश काळात या रेल्वेची रचना सर्व्हे आणि भूसंपादन करून नॅरोगेज रेल्वे निर्मिती होणार होती .परंतु ती झाली नाही , आणि ही रेल्वे निर्माण झाली तर या भागातील भाजी पाला , फुले , फळे , साखर , दूध इत्यादी स्वस्त वाहतुकीचे द्वारे प्रमुख शहरांना पोहचवणे सुलभ होईल म्हणून या भागातील अनेक कार्यकर्त्यांनी याचे स्वप्न पाहिले. विद्यमान आ रणजित सिंह मोहिते पाटील हे यू पी ए चे काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्य सभेचे खासदार म्हणून पाठवले होते , डॉ मनमोहन सिंग यांचे सरकार असताना या सरकार मध्ये ममता बॅनर्जी या केंद्रीय रेल्वे मंत्री असताना संसदेच्या पटलावर पंढरपूर लोणंद रेल्वे ची मागणी तत्कालीन खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली व तशी नोंद सापडते
कै.सहकार महर्षी श ना मोहिते पाटील यांच्या जन्मशताबदीनिमित्त अकलूज येथे झालेल्या कार्यक्रमास तत्कालीन रेल्वे मंत्री ना सुरेश प्रभू आले असताना तेंव्हा आचारसंहिता असताना ही जाहीर सभेत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पंढरपूर लोणंद रेल्वेची मागणी केली .रेल्वेचे स्वतंत्र बजेट मांडण्याची प्रथा तेंव्हा होती , आणि या बजेट मध्ये ना सुरेश प्रभू यांनी पंढरपूर लोणंद ब्रॉड गेज रेल्वे साठी 1000(एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आणि नव्याने सर्व्हे करण्यासाठी टोकण म्हणून 100कोटी रुपये मंजूर केले.महाराष्ट्रातील आचारसंहिता संपल्या नंतर कऱ्हाड येथे एका कार्यक्रमा साठी ना सुरेश प्रभू आल्या नंतर माळशिरस तालुक्यातील या रेल्वे साठी निवेदन देऊन सातत्याने मागणी लाऊन धरणारे ऍड सोमनाथ अण्णा वाघमोडे आणि कांहीं सहकारी मोठा हार घेऊन त्यांचा सत्कार करण्यासाठी गेले असता .त्याच हारात विजयसिंह जी मोहिते पाटील साहेब यांना घेऊन ते म्हणाले , यात माझे एकट्याचे श्रेय नाही तर हा प्रश्न सुटावा म्हणून केलेल्या प्रयत्नात विजय दादांचे ही योगदान आहे.असे जाहीर रित्या सांगितले ,याची खातरजमा कोणीही करू शकतो.
2 ),,,,,,,,,,,,,
नीरा देवघर
~~~~~~~
1930 साली कामत कमिटी चे अहवाल नुसार नीरा खोऱ्यात भाटगर धरणाच्या पाणी वाटपाचा आराखडा तयार झाला होता फलटण , बारामती , माळशिरस , सांगोला , आणि पंढरपूर तालुक्यातील कांहीं गावे यांचा समावेश करण्यात आला होता कै. डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना नीरा नदी खोऱ्यातील” देवघर “गावाच्या नाजिक धरण निर्मिती चां आराखडा तयार करण्यात आला .सदर आराखड्यातून संपूर्ण माळशिरस तालुका वगळण्यात आला होता .
तत्कालीन काळात मंत्रिमंडळ रचना त्री स्तरीय होती ,
1कॅबिनेट 2 राज्य मंत्री 3उप मंत्री विजयसिंह जी मोहिते पाटील साहेब यांच्या कडे पाटबंधारे विभागाचे उप मंत्री पद होते या आराखड्याच्या मंजुरी साठी ती फाईल दादा कडे आली तेंव्हा त्या फाईलवर सही करण्यास दादा नी नकार दिला .दादा सही करत नाहीत म्हणून मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी कै. वसंतदादा पाटील साहेब यांचे कडे तक्रार केली , तेंव्हा त्यांनी या संबंधी विचारणा केली असता , विजय दादा नी सर्व हकीगत वसंतदादा यांना सांगितली . कै. वसंतदादा हे मोठे नेते होते , त्यांनी सांगितल्या नंतर माळशिरस तालुक्याचा समावेश या आराखड्यात करण्यात आला .नीरा देवघर चे भूमी पूजन झाले , आणि रखडत रखडत का होईना पण धरणाचे काम पूर्ण झाले .कृष्णा खोरे विकास महामंडळ चे प्रमुख म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब यांनी लोकांचे पुनर्वसन करून आणि आर्थिक तरतुदी साठी कर्ज रोखे निर्माण करून पैसा उभा केला , या कामात त्यांचे प्रचंड मोठे योगदान आहे व ते इतिहासाला नाकारता येत नाही.तत्कालीन काळात विदर्भात प्रचंड असंतोष धुमसत होता , आणि अगदी स्वंतत्र विदर्भाची मागणी जोर धरत होती .त्यांचा आक्षेप हाच होता की , पच्छिंम महाराष्ट्रात विकास निधी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो व विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याची मागणी जोर धरत होती तत्कालीन राज्यपाल मा पी सी अलेक्झांडर साहेब यांच्या आदेशाने सगळा निधी विदर्भात वळवण्यात आला आणि पच्छिंम महाराष्ट्रतील प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या निधी ला 25ते 30वर्ष बँन (बंदी) आणली गेली .ही बंदी उठली तेंव्हा भाजपा त प्रवेश करताना मोहिते पाटील यांनी स्वतः साठी व्यक्तिगत फायद्याचे कांहीं ही न मागता “नीरा देवघर” व “कृष्णा भीमा स्थिरीकरण ” या प्रकल्प पूर्तीची मागणी भाजप कडे केली .या कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेची येच्छेत टिंगल टवाळी शिंदे बंधू यांनी केली
आणि दुर्दैव असे की कोणतेही संयुक्तिक कारण नसताना ज्यांचा या योजनेशी कोणताही सबंध नव्हता अश्या आमदारांना सोबत घेऊन आणि मोहिते पाटील यांना वगळून भाजपने बैठका आयोजित केल्या .
मोहिते पाटील यांना कोणतेही श्रेय जाऊ नये या दृष्ट हेतूने केलेली ही अन्यायमुलक कृती होती .
3 ),,,,,,,,,,,,,,
कृष्णा भीमा स्थिरीकरण
~~~~~~
कृष्णा भीमा स्थिरीकरण किंवा (फ्लड डायव्हर्षण योजना) मूळ योजनेचे बदललेले नाव ही अचानक आभाळातून आलेली आणि आत्ताच्या खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची कल्पना नाही किंवा तो आराखडा ही त्यांचा नाही .मराठवाड्यातील तीव्र पाणी टंचाई वरील उपाययोजना म्हणून मराठवाड्याला 23 टी एम सी पाणी उजनी धरणातून देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता .उजनी हे 110 टी एम सी चे भीमा नदी वरील सर्वात मोठे धरण असले तरीही या धरणावर असंख्य छोटी धरणे आहेत आणि ती भरल्यवरच उजनी धरण भरते , धरणात गाळ व रेती भरली गेल्याने आणि मृत पाण्याचा साठा लक्षात घेता उजनी चे पाणी सोलापूर जिल्ह्यातील लोकांना ही पुरत नाही .पाण्याचे एक तरी आवर्तन सोडावे म्हणून जनहित संघटनेच्या प्रभाकर देशमुख उर्फ भैय्या यांना तीव्र आंदोलन छेडावे लागले होते .यावर कमेंट म्हणून ऐतिहासिक असे उदगार ना अजित दादा यांनी काढले होते “धरणात च पाणी नसेल तर मी धरणात मु × का?”ही स्थिती असल्यानेच विजयसिंह जी मोहिते पाटील साहेब यांनी या उचल योजनेला तीव्र विरोध करत राजीनामा देऊन सत्तेबाहेर पडण्याची तयारी दर्शवली .शासनकर्ते म्हणून एका विभागाचे पाहताना दुसऱ्या विभागावर अन्याय करू नका , मराठवाड्याला ही पाणी मिळाले पाहिजे आणि उजनीत ही बाहेरून पाणी आले पाहिजे असा मार्ग एकच होता कृष्णा खोऱ्यातील महाराष्ट्राच्या वाट्याचे कर्नाटकात वाहून जाणारे 110टी एम सी पाणी उचलून ते बोगद्या द्वारे नीरा भीमा नदीला जोडून व या नदीवर अत्याधुनिक बॅरेज बांधून त्यात पाणी अडवणे ,या साठी पहिल्यांदा सर्व्हे साठी आणि योजनेसाठी तरतूद करण्यात आली
तत्कालीन वृत्तपत्रे पाहिली असता या कामासाठी आलेल्या शासकीय वाहनावर तत्कालीन युवक काँग्रेस चे नेते म्हणून रणजितसिंह निंबाळकर यांचे नेतृत्वा खाली प्रचंड विरोध करण्यात आल्याची व दगडफेक केल्याची वार्तांकन सापडते .मोहिते पाटील यांना विरोध म्हणून ही योजनाच फसवी आहे असे म्हणून आ संजयमामा आणि आ बबनदादा शिंदे यांनी ही विरोध केल्याचे पुरावे आहेत
बच्चू भाऊ कडू यांच्या कडे या खात्याचे मंत्रिपद असताना या योजनेसाठी ज्या बैठका मोहिते पाटील यांनी घेतल्या त्याच्या नोंदी अस्तित्वात आहेत.अश्या कोणत्याच मिनिट्स ऑफ मीटिंग खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या नाहीत फक्त चमको गिरी करण्यासाठी आणि विद्यमान खासदार यांनाच पुन्हा संधी देण्यासाठी भाजप ने त्यांचे मार्केटिंग केले , त्यांचे समवेत फोटो सेशन केले , आणि सर्वात कार्यक्षम टेन टॉप खासदार अशी जाहिरात सुरू केली .अर्थकारणाच्या आधारे पत्रकार विकत घेऊन ही हा प्रचार करण्यात आला त्याला अज्ञानी लोक बळी पडत आहेत आणि ज्यांनी आपले आयुष्य या साठी खर्ची घातले त्यांनी कांहीच केले नाही असा उलट प्रचार चालू केला आहे ..याची खंत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब यांनी थेट भाषणातून व्यक्त केली ,
मी माझ्या पत्नी मुलाकडे दुर्लक्ष केले पण सार्वजनिक हिता चे कामाला वाहवून घेतले ते आज नाकारले जात आहे , मोहिते पाटील यांचे दुर्दैव तर याहून अधिक आहे , ते तर खंत ही व्यक्त करू शकत नाहीत .एका सामूहिक कट कारस्थानाचे बळी त्यांना बनवले जात आहे , आणि यात त्या ही पक्षाचा समावेश आहे जो पक्ष आपल्याला साथ देईल असे वाटले .मोहिते पाटील यांचे मीठ आळणी ठरले , त्यांनी निवडून दिलेले आमदार खासदार , आणि निवडलेले पक्ष ही बेईमान निघाले .खऱ्या चे खोटे आणि लाबाडाचे त्वांड मोठे अशी म्हण भाजपने सार्थ केली आहे ,,,
तूर्त इतकेच,,,,,,!



