महाराष्ट्र
मराठ्यांच्या “आंतरवाली” ला भेटले खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि भावी आमदार शिवतेजसिंह मोहिते पाटील…

🎯 सदैव सोबत असल्याचा दिला विश्वास…
🎯 आजच्या दिवसातील ग्रेट राजकीय भेट…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
आज अंतरवली सराटी येथे जाऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले “संघर्षयोद्धा” आणि मराठ्यांचा आंतर वाली मनोज भाई जरांगे पाटील यांची माढा चे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माढा तालुक्याचे भावी आमदार शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी भेट घेतली…

मनोज भाई जरांगे पाटील यांच्या लढ्यात आम्ही सदैव त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला…

या वेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोबत 100 गाड्यांचा ताफा अंतरवाली सराटी येथे पोहचला होता या मध्ये माढा तालुक्यातील मराठा समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते, हे विशेष…



