“सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ध्यास –विद्यार्थी उद्योजकते चा विकास “. सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचा स्किलथॉन 2023 स्पर्धेमधील सहभागाबद्द सत्कार संपन्नता

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
अकलूज , येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी दि. २० जून २०२३ रोजी नॉर्थकोट प्रशालेच्या परिसरात घेण्यात आलेल्या” स्किलथॉन 2023 ” या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. सदर स्पर्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, उदयम फाउंडेशन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच जिल्हा व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालय यांच्या वतीने घेण्यात आली.
विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कल्पना सत्यात उतरवण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन विद्यापीठ तसेच वरील संस्था यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.त्यामध्ये जिल्ह्यामधून विविध नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील सात ग्रुपनी सहभाग नोंदवला.महाविद्यालयामधील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी चि. शंकर मच्छिंद्र गोसावी आणि चि. सचिन आप्पा भराटे यांनी ऑटोमॅटिक सेपरेशन अँड स्टोरेज ऑफ ड्राय अँड वेट गार्बेज या विषयाचा प्रकल्प सादर केला.

महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या स्किल थोन 2023 स्पर्धेमधील सहभागाबद्दल व उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बी एस.साळुंखे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे, विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सुरज शिंदे , पदविका संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. गौरव फडे उपस्थित होते. यावेळी डॉ. बी. एस. साळुंखे यांनी विद्यार्थ्यांच्या उद्योजकता विकास संकल्पनांना महाविद्यालयामध्ये वाव दिला जातो, या उपक्रमाचे कौतुक केले व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
डॉ . प्रविण ढवळे
प्राचार्य
सहकार महर्षि शंकररराव मोहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर – अकलूज.



