शहर

पालघर शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा पालघर मुख्याधिकारी यांना इशारा

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर शहरातील बांधकाम व दुरुस्ती ठेकेदारांसह नगर अभियंते यांना केवळ पोहोचण्यासाठी घेतलेल्या पालघर नगरपरिषदेच्या मनमानी कारभारामुळे पालघर शहरातील सर्वत्र रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
या खड्डेमय रस्त्यामुळे पालघर भागातील अनेक वाहतूकदारांना व नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

याला सर्व ठेकेदार व पालघर नगरपरिषद जबाबदार आहे. असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत असून याबाबत मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी पालघर शहरातील सर्व खड्डेमे रस्ते पालघर मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष दाखवून याबाबत पालघर मुख्याधिकारी यांना मनसे कडून निवेदन पत्र देण्यात आले

या पत्रात मनसेकडून पालघर मुख्याधिकारी यांना हे रस्ते दुरुस्त न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी जिल्हा सचिव दिनेश गवई, मनसे तालुका उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष वाहतूक सेना ग्रामीण चेतन पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी सुनील राऊत, शहर अध्यक्ष निशांत धोत्रे, शहर संघटक उदय माने, शहर उपाध्यक्ष मिथुन चौधरी कुणाल कुंटे, हेमंत घोडके तसेच शहरातील सर्वत्र मुख्य मनसे पदाधिकारी व मनसे सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button