शहर

सोलापूर जिल्ह्यातील भाजपा ला खिंडार…

माढा लोकसभा मतदार संघाची मुलुख मैदानी तोफ खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा भाजपा ला आणखी एक धक्का…

भाजपा च्या अल्पसंख्याक गटाचे मुख्तार कोरबु राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात…

आमीर मोहोळकर,प्रतिनिधि,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

शिव स्वराज्य यात्रेच्या निमित्ताने अकलूज येथील कृष्णप्रिया हॉल येथे झालेल्या भरगच्च कार्यक्रमात माढा लोकसभा मतदार संघाची मुलुख मैदानी तोफ खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा चे अध्यक्ष मुक्तार भाई कोरबू यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यां सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटा मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला…

या वेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते पक्षाचे उपरणे गळ्यात घालून मुख्तार भाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले…
व्यासपीठावर अजातशत्रू विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या सह प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब,माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील,शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे,युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब भाई शेख,माढा विधानसभा चे भावी आमदार शिवतेजसिंह मोहिते पाटील,ओबीसी चे राज राजापूरकर यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते…

लुकमान इनामदार,सलीम बागवान,जुबेर दुरुगकर,अब्दुल सय्यद,तालुकाध्यक्ष रशीद भाई मुलाणी,हमीद मुलाणी,शकीलभाई कोरबू,अशफाक काझी,शाहरुख काझी,सलमान दुरुगकर मुजीब कोरबू,मुसा मुलाणी,महंमद हनीफ मोमीन,आरफान बागवान,निहाल कोरबू,शिवाजीराव माने,रिहाल कोरबू यांच्या सह भाजप आणि इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button