महाराष्ट्र

माळीनगर येथील नागरिक 7 ऑक्टोबर रोजी करणारा रस्ता रोको व साखळी उपोषण मागणी मान्य न झाल्यास मतदानावर टाकणार बहिष्कार?

प्रतिनिधी- रियाज मुलाणी

माळीनगर:गेली कित्येक महिने झाले माळीनगर मधील श्रीहरीनगर या ठिकाणी क्रॉसिंग साठी कट पॉईंट करण्यात यावा या मागणीसाठी सर्व स्थानिक नागरिक प्रयत्न करत आहेत
त्याचे कारण माळीनगर मधून गेलेला संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हे आहे.कारण ह्या महामार्गमुळे माळीनगर गावाचे दोन भाग झाले,त्याचाच परिणाम श्रीहरीनगर या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, स्म्शान भूमी,माळीनगर व खंडळी ग्रामीण मार्ग व येथील शालेय विद्यार्थी व नागरिकांवर या ठिकाणी क्रॉसिंग साठी कट पॉईंट नसल्यामुळे ये जा करताना मोठया प्रमाणावर त्रास होत असल्याने

तेथील स्थानिक नागरिकांनी व ग्रामपंचायत ने महामार्गशी संबंधित रोड विभागाला व स्थानिक लोकप्रतिनिधी,प्रांत,सो अकलूज ,यांना वेळो वेळी पत्र व्यवहार केला आहे. व विनंती हीं केली आहे.परंतु अद्यापपर्यंत ह्या विषयाची कोणत्याही प्रकारची दखल घ्येतली नसल्याने दिनांक 04/10/ 2024 रोजी सायंकाळी ठीक 8 वाजता श्रीहरीनगर येथे माळीनगर मधील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन माळीनगर गावातून गेलेला संत तुकाराम महाराज पालखी महामार्गांवर्ती श्रीहरीनगर या ठिकाणी क्रॉसिंग साठी कट पॉईंट होण्यासाठी विचार विनिमय होऊन आत्ता पर्यंत सर्व ठिकाणी पत्र व्यवहार करून ही कसलीच दखल घ्येतली नसल्याने व येथील होत असलेली गैरसोय लक्षात घेता दिनांक 07/10/2024 रोजी सकाळी ठीक 11, वा श्रीहरीनगर या ठिकाणी रास्ता रोखो व साखळी उपोषण करणार असल्याचे ठरवले आहे.तसेच नागरिकांची क्रॉसिंग कट पॉईंटची मागणी मान्य न झाल्यास येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर्ती माळीनगर मधील सर्व नागरिकांनी मतदानावर्ती बहिष्कार टाकण्याचे ठरले आहे. आता तरी प्रशासन श्रीहरीनगर येथील स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे लक्ष देणार का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button