अकलूज महावितरण कंपनी कडून महावितरण आयोगाच्या नियमाचे पायमल्ली— मागील तीन चार दिवसापासून विजेच्या लपंडावामुळे वाढत्या तापमानात नागरिक त्रस्त

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
अकलूज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे मागील तीन ते चार दिवसा पासून अकलूज कर नागरिक त्रस्त झाले आहेत मागील पंधरा दिवसापासून वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून या तापमानामुळे माणसाच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे त्यामुळे नागरिक फॅन ,कूलर इत्यादी साधनांचा वापर करत असतात त्यामध्ये “दुष्काळात तेरावा महिना” या वक्तीप्रमाणे अकलूज महावितरण कंपनी वारंवार वीज खंडित करून नागरिकांना नाहक त्रास देण्याचे काम करत आहे त्यामुळे नागरिकात महावितरणच्या या मनमानी आणि गलथान कारभारामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत
विशेषतः या महावितरण कंपनीचा एक महावितरण म्हणून आयोग आहे त्या आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यामध्ये जर तीन तासापेक्षा अधिक तास वीज पुरवठा खंडित झाला तर महावितरण कंपनी कडून ग्राहक त्याची नुकसान भरपाई वसूल करू शकतात ज्यामध्ये जर वीज ग्राहकांचे कनेक्शन कमर्शियल असेल आणि तीन तासापेक्षा अधिक तास कमर्शियल ग्राहकाची वीज खंडित झाली तर वीज कंपनीने ग्राहकास 100 रुपये प्रति तास दंड द्यावा लागतो तसेच घरगुती वीज ग्राहक असेल तर आणि तीन तासापेक्षा अधिक तास वीज प्रवाह खंडित झाला तर वीज महावितरण कंपनीने घरगुती वीस ग्राहकांना 50 रुपये प्रति तास दंड द्यावा लागतो अशी तरतूद या महावितरण आयोगाच्या नियमात केलेली आहे

मात्र महावितरण कंपनी कडून या नियमावर पांघरुन घातले जाते हे नियम सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवले जात नसून महावितरण कंपनी या नियमाचे पायमल्ली करत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे ,त्याकरिता वीज ग्राहकांनी तीन तासापेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला तर महावितरण कंपनीच्या आयोगाकडे तक्रार करण्याची आणि नुकसान भरपाई ची मागणी करण्याची तरतूद यामध्ये असून याचा ग्राहकांनी उपयोग केला तर नक्कीच वीज पुरवठा खंडित होणार नाही आणि महावितरण कंपनीला वेळी जाग येईल विशेषतः वीज ग्राहकांनी एक दिवस जरी वीज बिल भरण्यास विलंब केला तर त्यांच्याकडून दंड आकारला जातो किंवा वीज पुरवठा खंडित केला जातो
तर महावितरण कंपनीकडून तीन तासापेक्षा अधिक तास वीज खंडित होत असेल तर ग्राहकाने महावितरण कडून नुकसान भरपाई का घेऊ नये? असे ही नागरिकांतून बोलले जात आहे शिवाय वाढती महागाई, बेरोजगारी ,मुळे नागरिक त्रस्त झाले असताना वीज बिलाच्या मीटर रिडींग व्यतिरिक्त इतर चार्जेस ,आधिभार लावून वीज ग्राहकांना लुटण्याचे काम महावितरण कंपनी करत आहे तरी वीज ग्राहकांनी वेळीच जागृत होऊन त्यांच्या विरोधात महावितरण आयोगाकडे रीतसर तक्रार देऊन आपली नुकसान भरपाई ची रक्कम वसूल का करू नये ?असेही नागरिकांमध्ये चर्चा होत आहे



