महाराष्ट्र

आभाळ म्हणजे आई आणि त्या आभाळातील सूर्य म्हणजे बाप—-(मातृत्वदिना निमित्त ) महेश कोळेकर

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

सर्वप्रथम सर्वांना मातृदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जन्म देते, सहन करते, लहानाच मोठं करते, सर्वकाही शिकवते, स्वतः उपाशी झोपून आपली भूक भागवते ती आपली आई असते. आई होणं सोपं नाही बाप होणं कोणाचंही काम नाही. जन्म देणं म्हणजे आई होणं किंवा नाव लावणं म्हणजे बाप होणं नसतंच मुळात. स्वतःच्या जिवापेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते. ठेच मुलांच्या पायाला लागते पण अश्रू मात्र आईवडिलांच्या डोळ्याला येतात. ही ममता असते आईवडिलांच्या प्रेमाची. लहानापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे आपले आईवडिल आपल्याला सांभाळतात.

स्वतःच्या जिवापेक्षा जास्त आपली काळजी घेतात. जगात अस एकच न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ केले जातात. जगात असा एकच वकील आहे जिथे पुरावा लागत नाही तो म्हणजे आपला बाप आहे. पण अलीकडे समाजातील चित्र बदलत असताना दिसून येत आहे. जन्मदिलेल्या आईवडिलांना घराबाहेर काढलं जात आहे. ज्यांनी भरपावसात तुमची झोपमोड होऊ नये म्हणून स्वतःच्या अंगावर पावसाचं पाणी झेलल आज त्यांना तुम्ही घराबाहेर काढता. कुठला न्याय आहे हा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जे तुम्ही आज पेराल तेच उद्या तुमच्या स्वतःच्या मुलांच्या रुपात तुम्हाला पाहायला अनुभवायला मिळणार आहे.

म्हणून सांगतोय पंख फुटले म्हणून जास्त हवेत जायचं नसत. कारण श्वास हा जमिनीवर मिळतो हवेत मिळत नसतो. मुकी जनावर सुद्धा प्रेम करतात जीवाला जीव देतात. आई वडील जेव्हा जेव्हा तुमच्या भल्यासाठी सांगितलं तेव्हा त्यांचं ऐकून घ्या. आयुष्यात एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. तुमच्या स्वतःच्या आईवडिलांपेक्षा जास्त तुमच्यावर कोणीच प्रेम करू शकत नाही. आणि काळजी ही घेऊ शकत नाही. हे जग फक्त स्वार्थी आहे पण आईवडिल सारथी आहेत. लक्षात ठेवा. पाखर सुद्धा दिवसभर आकाशात उडतात पण अंधार पडायला लागला की घरट्याकडे ओढ घेतात.

कारण त्यांनाही माहिती असत की त्या घरट्यात कोणीतरी त्यांची वाट पाहतय. ज्यांनी तुम्हाला आयुष्यभर स्वतःच्या ह्रयद्यात पूजल त्यांना तुम्ही वृद्धाश्रम बघायला लावणार का? हे कितपत योग्य वाटत तुम्हाला. ज्यांनी जगायला शिकवलं ज्यांनी सगळं जग दाखवलं ज्यांनी सर्वकाही दिल त्यांच्याशी तुम्ही अस वागणार का? आई आणि बाप पाठीमागून जेवण करतात पण पोराला आणि पोरीला आधी जेवण घालतात. कारण त्यांच्या चेहऱ्यावरच समाधान पाहून अर्ध पोट यांचं भरलेलं असत. तुम्हाला साधा ताप जरी आला तरी आई जीवाचं रान करते आणि बाप जीव गहाण ठेवायला तयार होतो.

हे प्रेम तुम्हाला काळ्या बाजारात पण मिळणार नाही. कायम लक्षात ठेवा. आयुष्य एकदाच मिळत पण सगळं काही सहज मिळत नसत. त्यासाठी खूप त्याग करावा लागतो. आयुष्यात काळीज झिजवाव लागत. मन आतून पेटवाव लागत. स्वतःच्या जिवापेक्षा जास्त काळजी घ्यावी. तेव्हा कुठं हे मातृत्व सिद्ध होत. असच कोणीही आई आणि बाप होत नसत. आई व्हायला आभाळा एवढं काळीज लागत. आणि बाप व्हायला आधी स्वतःला सूर्य व्हावं लागतं.

लेखक-महेश बजरंग कोळेकर
रा-काक्रंबावाडी ता-तुळजापूर जि-धाराशिव
संपर्क-9579228347/9146133047

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button