अकलूज येथे अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

उपसंपादक——हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867448
दि आर्ट ऑफ लिव्हींग, अकलूज शाखा वअकलूज पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिव्हिंग चे संस्थापक अध्यात्मिक गुरु श्री श्री गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस ठाणे अकलुज येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन अकलूज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ रामचंद्र मोहिते, इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. बाहुबली दोशी, बबलू शेठ ताम्हाणे,आदर्श शेतकरी सत्यवान सुर्यवंशी, शिवकुमार मदभावी,लायन्स क्लबच्या छाया बुराडे,हेमा माने आदी मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान म्हणजे माणुसकी ची पूजा या उदात्त हेतूने आयोजित केलेल्या या शिबिरात अत्यंत उष्ण वातावरणात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रा. धनंजय देशमुख तर आभार माऊली मुंडफणे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हरीभाऊ माने ,गोरख डांगे,विक्रम भोसले,युवराज वाघ,विठ्ठल कचरे,विरेंद्र पत्की यांनी सहकार्य केले.



