विशेष

जेऊर सह परिसरात ज्वारी काढणीला आला वेग, मात्र बाजार भाव कमी झाल्याने शेतकरी वर्गामध्ये कमालीचा नाराजीचा सूर

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा तालुक्यातील विशेषता जेऊर सह परिसरातील ज्वारी काढणीला वेग आला असून यंदा सर्वत्र ज्वारीचे पीक जोमात असून ज्वारीचे भाव कमी झाल्याने शेतकरी वर्गामध्ये कमालीचा नाराजीचा सूर दिसून येत आहे जिरायती पट्ट्यातील रब्बी हंगाम मधील ज्वारी काढणीला युद्धपातळीवर वेग आला आहे

पूर्व भागातील पांडे, फिसरे, हिसरे, सिद्धेश्वर नगर, हिवरे, कोळगाव, आवाटी, सालसे, साडे, निमगाव हवेली, गौंडरे कोळगाव या भागात सध्या ज्वारी काढणीला वेग आला आहे ज्वारी पिकाची काढणी तशी अवघड मानली जाते शेताला चांगली खतपाणी असले तर काढणीला त्रास होत नाही रान कडक झाले असल्यास ज्वारीचे ताट उपटले जात नाही त्यामुळे बोटे कापणे, फोड येणे, भरणे असे प्रकार घडतात त्यामुळे सध्या ज्वारी काढणीला मजूर मिळत नाही मजूर मिळाले तरी भरमसाठ मजुरी घेतली जातेअलीकडे इतर पिकाच्या तुलनेत ज्वारी पीक घेणे मोठे जिकरीचे झाले आहे बाजार भाव चांगला असला तरी ज्वारीची काढणी मळणी या गोष्टी अधिक कष्टाच्या झाल्या आहेत मजूर मिळत नसली तरी मित्रमंडळी नातेवाईक किंवा सावड करून ज्वारीची काढणी केली जातेसांगली सोलापूर भागातील मालदांडी राहुरी सफेद गंगा या जातीच्या ज्वारी बियाणाची पेरणी या परिसरात शेतकरी करतात जिरायत भागात अवकाळी पावसाच्या हजेरीने यंदा ज्वारी पीक जोमात आली आहे सध्या सर्वत्र ज्वारीच्या उत्पादनात मोठी वाढ झाली असून कडबा चांगल्या प्रकारे निघणार आहे त्यामुळे कडव्यालाही चांगल्या प्रकारचा भाव मिळण्याची शक्यता आहे असे शेतकरी दत्ता क्षीरसागर ज्योतीराम शिरसागर तसेच संतराम शिरसागर यांनी बोलताना सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button