महाराष्ट्र

निसर्ग पर्यटन निधीबाबत करमाळा तालुक्यावर अन्याय, मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार :- माजी आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी आणि शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

निसर्ग पर्यटन निधी बाबत करमाळा तालुक्यावर अन्याय होत असून या बाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा करणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. यावर अधिक सविस्तर माहिती देताना माजी आमदार पाटील यांनी सांगितले की नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील निसर्ग पर्यटनास गती मिळावी म्हणून ३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात असला आणि यात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, माळशिरस आणि पंढरपूर या तालुक्यांचा समावेश केला गेला. धार्मिक पर्यटनास निसर्ग पर्यटनची जोड देऊन या चार तालुक्यात काही ठिकाणांचा विकास केला जाणार आहे. वास्तविक पाहता करमाळा तालुक्यातील चिखलठान या ठिकाणी श्री कोटलिंग हे देवस्थान असून उजनी बॅक वॉटर परिसरात असलेले हे एक प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणास पर्यटन विकास मध्ये समाविष्ट केले जावे ही मागणी आपण यापूर्वीच केली असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असे. चिखलठान येथे श्री कोटलिंग देवस्थान मंदिरास भेट देऊन दर्शनासाठी वर्षभरात लाखो भाविक येतात. जर या धार्मिक स्थळास निसर्ग पर्यटनाची जोड देऊन या परिसराचा विकास केला तर या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. उजनी धरण, बोटिंग, पक्षी निरिक्षण यासाठी हा परिसर एक उत्तम परिसर असून परदेशातून पक्षी येथे स्थलांतरित होऊन काही काळासाठी येत असतात. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ह्या भागाची निवड केली जाते. या शिवाय चिखलठान येथील श्री कोटलींग देवस्थान तसेच श्री हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून परिचित असलेले कुगाव येथील मंदिर याच परिसरात मोडते. यामुळे धार्मिक व नैसर्गीक पर्यटनास हा भाग उत्तम असून याचा समावेश पर्यटन विकास यादीत केला जाऊन याचा प्रस्ताव तातडीने तयार व्हावा यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना साकडे घालणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. तर विद्यमान आमदार महोदयांची जिल्हाधिकारी यांच्या समवेतची बोटिंग हा केवळ एक जलविहार आणि राजकीय फार्स होता हे निधीच्या यादी वरून उघड झाले आहे.आमदार महोदयांच्या  निष्क्रियपणामुळेच करमाळा तालुक्यावर पर्यटन विहासबाबत अन्याय झाला असल्याचा आरोप पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button