सफाळे परिसरात बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर तालुक्यातील सफाळे पुर्व व पश्चिम भागात बोईसर विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामविकास विभाग सार्वजनिक बाधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विमाग तसेच डॉ. बाबासाहेब आबेडकर विकास योजना अल्पसंख्यांक वस्ती सुधार योजना या विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांच्या भूमीपुजना सोहळा शुक्रवारी माकणे, कपासे सह अन्य गावात झाला. यावेळी पेनंद , घाटीम, जाभूळपाडा, नवघर मुख रस्ता, कपासे , माकणे ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आमदार राजेश पाटील यांचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. यावेळी तरुणांनी व स्त्रियांनी आपल्या समस्या आमदार राजेश पाटील यांच्यासमोर मांडल्या. आमदारांनी देखिल याची त्वरित दखल घेऊन ही कामे लवकरच मार्गी लागतील असा विश्वास गावकऱ्यांना दिला.

यावेळी माकणे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद शेलार यांनी बहुजन विकास आघाडी मध्ये प्रवेश केला. त्यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश तरे, युवा तालुका अध्यक्ष कामनिश राऊत, नवघर घाटीम चे उपसरपंच दर्शन पाटील, पि.टी पाटील, सचिन आकरे, सफाळे ग्रामपंचायत उपसरपंच राजेश म्हात्रे, माकणे सरपंच प्रमोद शेलार माजी उपसरपंच दिलीप तरे, कपासे सरपंच प्रकाश कोंब, हेमंत पाटील तसेच आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व अनेक कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.