माळशिरस तालुका वैद्यकीय आघाडी अध्यक्षपदी डाॅ.युवराज सोलनकर यांची निवड

माळशिरस तालुका प्रतिनिधी
महेश मोहिते
मोबाईल नंबर 83 80 84 86 73
माळशिरस तालुक्यातील गणेशगाव येथील डॉ.युवराज सोलनकर यांची माळशिरस तालुका भाजप वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष पदी निवड झाली असून तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष मामासाहेब पांढरे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे .डॉक्टर युवराज सोलनकर यांच्या निवडीमुळे पक्ष चळवळ, पक्ष वृद्धीसाठी आपल्या कार्याचा व अनुभवाचा लाभ भाजपच्या माळशिरस तालुका वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून सामान्य मानवाच्या कल्याणासाठी होईल. त्यासाठी डॉ. सोलनकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे माळशिरस तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात एक धडाडीचे नेतृत्व मिळाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला न्याय मिळेल. डॉक्टर युवराज सोलंकर यांची निवड झाल्याबद्दल विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील ,शिवतेजससिंह मोहिते पाटील ,यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच टाइम्स नाईन मराठी यांच्याकडून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा.



