विशेष
मोक्का गुन्हातील फरार असलेला आरोपी ओमकार जाधव कोंढवा पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनीधी.. रियाज मुलाणी
टाईम्स 9 मराठी
मोक्का गुन्हातील फरार असलेला आरोपी ओमकार दीपक जाधव वय वर्ष 20 राहणार आदर्श नगर उरळी देवाची हा गेली पाच महिन्यापासून फरार होता त्याच्या राहते घरी व इतरत्र शोध घेतला परंतु तो मिळून येत नव्हता सदर आरोपी मिळून येणे कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील यांनी 16 2 2024 रोजी टीम तयार करून आरोपीचा शोध घेण्याकामी रवाना केले हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शाहीद शेख व संतोष बनसोडे यांना गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाली की मोक्का गुन्हातील फरार आरोपी ओमकार जाधव हांडेवाडी चौक पुणे येथे थांबला आहे अशी माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील यांनी त्यांच्या सोबत असलेला स्टाफ यांच्यासह हांडेवाडी चौक येथून आरोपी नामे ओमकार दीपक जाधव यास ताब्यात घेतले आहे.