महाराष्ट्र

पोंधवडी चारीच्या अस्तरीकरणाच्या कामाचा शुभारंभ… आ. संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

गेली २५ वर्षें प्रतिक्षेत असलेल्या कुकडी डावा कालवा अंतर्गत पोंधवडी शाखा कालवा-हुलगेवाडी चारीचे कामाचा शुभारंभ ६ जानेवारी २०२२ रोजी करमाळा तालुक्याचे विकास प्रिय आमदार संजय मामा शिंदे यांचे शुभहस्ते व मा. आ. जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला होता. यासाठी ९ कोटी २३ लक्ष निधी मंजूर झाला होता. संजय मामांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बोगद्याचे काम वेळेपूर्वीच पूर्ण होऊन कुस्करवाडी चारीतून चाचणीचे पाणी ३ ऑगस्ट २०२३ रोजी सोडले होते.त्यावेळी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी पाणी पूजन करून आनंदोत्सव साजरा केला केला होता. परंतु या चारयांमधून गळती होत होती. त्यास अस्तरीकरण लवकर होणे बाबत परिसरातील नागरिकांनी संजय मामा यांचे कडे मागणी केली होता. संजय मामांनी याही कामाचा पाठपुरावा करून अस्तरीकरण काम मंजूर करून घेतले आहे. या कामाचा शुभारंभ कोर्टी ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज दिनांक १९/२/२०२४ रोजी संपन्न झाला. यावेळी निलकंठ अभंग सेवा निवृत्त कृषी अधिकारी, संजय जाधव सर मा. उपसभापती, श्रीरंग मेहेर अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग, नानासाहेब झाकणे उपसरपंच कोर्टी, पै. आप्पा शेरे, हनुमंत जाधव , आशिष गायकवाड संचालक मकाई स.कारखाना, विकास गावडे, दादा गावडे, शशिकांत गावडे, रुपचंद गावडे मा. उपसरपंच, भय्या इनामदार, मनोहर शेरे, मोहन गावडे, नागेश जाधव, राजाभाऊ शितोळे, मुन्ना शेख इ. मान्यवर उपस्थित होते. संजय मामांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वांगीण विकास कामात गती प्राप्त होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button