पालघर जिल्ह्यातील मनोर वैतरणा खाडीत शार्क माश्याच्या हल्ल्यात (32) वर्षीय तरुण गंभीर जखमी
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत..भ्रमणध्वनी क्रमांक- 7030516640
पालघर जिल्ह्यातील मनोर लगतच्या वैतरणा खाडी पात्रात आलेल्या दोनशे किलो वजनी शार्क माशाने मासेमारीसाठी गेलेल्या (32) तरुणाला गंभीर जखमी केले आहे.या तरुणाला उपचारासाठी गुजरात येथील सिल्वासा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमारे दोनशे किलो वजन असलेला शार्क मासा पकडण्यात मनोर ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाड डोंगरीच्या ग्रामस्थांना यश आले आहे.वैतरणा खाडी पात्रात ओहोटीच्या वेळी पाण्याचा स्तर कमी झाल्याने शार्क माशाचा वावर वैतरणा खाडी पात्रात मासेमारी करणाऱ्या ग्रामस्थांना दिसला शार्क मशाने खाडी पात्राच्या पलीकडे लाकडे आणण्यासाठी गेलेल्या तरुणाला खाडी पात्र ओलांडताना चावा घेत पायाचा लचका तोडला आहे. या जखमी तरुणाला गायकवाड डोंगरी वरील ग्रामस्थांनी पुढील घरासाठी गुजरात सिल्वासा रुग्णालयात दाखल केले आहे . पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने शार्क मासा नदीच्या बांधाला अडकून मृत्युमुखी पडला आहे.विकी सुरेश गोवारी वय वर्ष (32)असे या तरुणांचे नाव असून त्याला पुढील उपचारासाठी गुजरात येथील सिल्वासा रुग्णालयात दाखल केले आहे .