पालघर पोलिसांनी दरोडा व खुनाच्या गुन्ह्यांमधील सात आरोपींना जेरबंद करून… चोरीचा मुद्देमाल केला जप्त

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
पालघर शहर व जिल्ह्यात घडणाऱ्या विविध गुन्ह्यां मधील आरोपींना कमीत कमी काळात शोध घेऊन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग गुन्हेगारांच्या शोधासाठी होत असून यामुळेच गुन्ह्यांचा छडा लावण्यात पालघर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे .स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने खुनाचे तसेच घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना गजाआड केले आहे. दोन गुन्ह्यातील सात आरोपींना जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे .

मोखाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वैतरणा नदीवरील पुलाच्या खाली एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्याच्या हातावर मराठीत आईबाबा व राणा राजपूत मराठी असे कोरलेले होते. त्याच्या आधारे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक पंकज शिरसाठ, उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे, स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते आदींनी संयुक्त तपास करून कोणताही पुरावा हाती नसताना खुनाचा तपास लावला आहे. हा खून पाण्याच्या पैशावरून झाला होता.मृत तरुण उल्हासनगरचा असून तो पाणी विकणाऱ्या टोळींकडून दरमहा पैसे वसुली करीत होता. त्याच्यावर कल्याण पोलिस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल होते. या प्रकरणी पेंटया जगल्या चितारी, (वय ३८ राहणार इंदिरानगर, टिटवाळा), साईकुमार उलय्या कडामाछी (वय २२, राहणार इंदिरानगर, टिटवाळा), किशोर जितेंद्र शेट्ये (वय २९ राहणार बिर्ला कॉलेजच्या मागे शहाड, कल्याण) यांचा गुन्ह्यातील हात उघडकीस आला. हे मूळचे तेलंगणा राज्यातील असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि जिल्हा पोलिस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने त्यांना हैदराबादमधून अटक केली.पैसे मागितल्याचा रागयातील आरोपी हे परस्परांचे मित्र आहेत. रेल्वेत पाण्याच्या बाटल्या विक्रीचा व्यवसाय हे मित्र करीत होते. मृत तरुण त्यांच्याकडून दरमहा पैशाची मागणी करीत होता. घटनेच्या दिवशी पैसे मागण्यासाठी मृत तरुण आरोपींच्या घरी गेला असता त्याला मद्य पाजून, पाईपने मारहाण करून त्याचा खून केला. नंतर कारमधून खडकवलीमार्गे कसारा घाटातून मोखाडा रस्त्यावर वैतरणा नदीच्या पुलावर आणून पुन्हा त्याच्यावर सुऱ्याने वार करून डोक्यावर दगड घालून हे सर्व आरोपी पसार झाले परंतु पोलिसांनी त्यांना हैदराबादमधून अटक करून मोखाडा येथे आणलेदरोडा प्रकरणी चौघे उत्तर प्रदेशातून ताब्यातपालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरीच्या घटनेतील चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद शकीब मोहम्मद शौकत (अन्सारी वय २३ रा. चिपरी पोस्ट बोरकोट तालुका व जिल्हा बिजनोर. उत्तर प्रदेश), मोहम्मद उमर महबूब अहमद (वय ३५ राहणार जामिया रेसिडेन्सी मिरत), फर्मान अहमद मुजमील अहमद (वय ४१ राहणार जामीन रेसिडेन्सी मिरत), मोहम्मद दानिश मोहम्मद वरिष्ठ मलिक (वय २४, राहणार फत्तेपुर मिरत) यांना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी राज्यातील विविध भागात चोरी केल्याच कबूल केल आहे.दरम्यान त्यांच्यावर बोईसर पालघर आदी ठिकाणी दिवसा ढवळ्या घरफोड्या केल्याचा गुन्हे दाखल असून. वाहन चोरी करून, त्याला बनावट क्रमांक लावून त्यातून पसार व्हायचे असे या चोरांची कार्यपद्धती होती. चोरीचे वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.