शहर

सफाळे परिसरातील तब्बल 37 ग्रामपंचायतींसाठी विराथन बुद्रुक चाफेवाडी गावात राज्य शासनाच्या अभियाना अंतर्गत मोफत संपूर्ण आरोग्य-औषधी शिबिराचे आयोजन….केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय समिती सदस्य कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

महाराष्ट्र शासनाच्या अभियाना अंतर्गत
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे समिती सदस्य कुणाल सुरेश पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी प्रथमच पालघर जिल्ह्या मध्ये महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त अभियाना अंतर्गत मोफत संपूर्ण आरोग्य-औषधे शिबिर सफाळे पश्चिम येथील विराथन बुद्रुक चाफेवाडी या गावात शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी राबविले जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाचे म.आ.पोदार व रा. आ.पोदार रुग्णालय (आयु) वरळी मुंबईचे विविध आरोग्य चिकित्सा विभागातील तब्बल 40 डॉक्टरांची टीम या शिबिरात उपस्थित राहणार आहे . या टीम मध्ये वरिष्ठ डॉक्टर हे पीएचडी, एमडी, एमएस स्तराचे डॉक्टर असणार आहेत.
स्त्रीरोगतज्ञ बालरोगतज्ञ वृद्धतज्ञ पुरुष तज्ञ अशा विविध तज्ज्ञांच्या कडून संपूर्ण आरोग्याची तपासणी तसेच मोफत औषध,गोळ्या,ड्रॉप्स, ऑइंटमेंट, तेल इत्यादींचे वाटप होणार आहे. नवजात बालकांपासून ते सोळा वर्षाच्या बालकांपर्यंत अगदी सुवर्णप्राशनाचे डोस मोफत दिले जाणार आहेत. तसेच महिलांसाठी स्तन कॅन्सर गर्भाशी संबंधित विकार स्तन कॅन्सर, गर्भाशय संबंधित विकार इत्यादींची तपासणी तसेच जनजागृती व्याख्यान व प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ह्या शिबिरामध्ये सर्व नेत्ररोग कान- नाक -घसा,मधुमेहजन्य विकार तिरळेपणा,मोतीबिंदू, काचबिंदू मूळव्याध,परिकार्तिका,उंडूक पुच्छा शोध स्तन ग्रंथी मधुमेहजन्य व्रण वंध्यत्व श्वेतप्रदर कष्टार्थ अनर्थ गर्भिणी हर्दि सुतिका विकार ज्वर कृमी कास अतिसार त्वक विकार वात रक्त संधिवात आमवात पक्षवाद ग्रंथ सी जानू संधीवात कटिगतवाद थौल्य मोन्यागत वात अंश संधिवात इत्यादींचे आणि अशा प्रकारच्या कैक आजारांचे संदर्भात आरोग्य तपासणी व निदान व त्या संदर्भातल्या औषधांची मोफत पूर्तता केली जाणार आहे.

हे अतिमहत्त्वाचे व उपयोगाचे संपूर्ण आरोग्य औषधे शिबिर सफाळे विराथन बुद्रुक चाफेवाडी गावामध्ये खासदार राजेंद्र गावित पालघर लोकसभा, मुख्य कार्यकारी अधिकारी पालवे जिल्हा परिषद पालघर, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप जिल्हा परिषद पालघर , गटविकास अधिकारी रेवंडकर पंचायत समिती पालघर व मुख्यअधिकारी सामान्य रुग्णालय पालघर संजय बोदडे ह्या सगळ्यांच्या सहकार्याने व केंद्रीय समिती सदस्य कुणाल पाटील यांच्या सततच्या केलेल्या प्रयत्नांनी शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी राबविले जाणार आहे.
तरी सर्व सफाळे परिसरातील ग्रामपंचायतीतील नागरिकांना महाराष्ट्र शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या ह्या संपूर्ण आरोग्य औषधे शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button