विशेष

स्वतःच्या मोबाईलवर स्टेटसला फोटो ठेवून.. स्वतःला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या चिरागचा 48 तासात शोध घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी केले सुखरूप पणे कुटुंबीयांच्या स्वाधीन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

पालघर जिल्हा प्रतिनिधी

विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक- 7030516640

स्वर्गवासी झालेल्या व्यक्तीला नातेवाईक किंवा मित्र मंडळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात पण जिवंत माणूस स्वतःचा फोटो स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस म्हणून ठेवून स्वतःलाच स्वतः भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारी घटना पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील केळवा धावंगेपाडा गावात घडली आहे. या घटनेतील 25 वर्षीय युवक चिराग सुरेश झुंजारराव राहणार केळवा धावंगे पाडा व्यवसाय ड्रायव्हिंग हा काही वर्षाआधी केळवा रोड स्टेशन परिसरात दुसऱ्यांचा गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. यानंतर त्यांनी स्वत: प्रवासी वाहतुकीसाठी गाडी घेतल्यानंतर या भागातील प्रवासी युनियन बरोबर त्याचा शाब्दिक गाडी लावण्यावरून वाद -संवाद झाला होता. यानंतर त्याची गाडी बंद होती. व6 फेब्रुवारी 2024 रोजी त्याच्या नातेवाईकांनी तो मिसिंग झाल्याची तक्रार केळवा सागरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.या तक्रारीच्या अनुषंगाने पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ता.के.शेळके सह केळवा पोलीस कर्मचाऱ्यांनी चिरागचा मोबाईल बंद असताना देखील 48 तासात कौशल्यपूर्ण तपास करून बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी त्याला नालासोपारा येथून सुखरूप पणे शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. चिराग सुरेश झुंजारराव यांनी त्याच्या स्वतःच्या मोबाईलवर स्वतःचा फोटो ठेवून स्टेटस वर भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहून ठेवले होते. व आपला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला होता. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये गेल्या दोन दिवसापासून भीतीचे वातावरण पसरले होते. या चिरागचा शोध घेऊन त्याला बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी सुखरूप पणे त्याच्या कुटुंबियांन स्वाधीन करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता.के. शेळके केळवा सागरी पोलीस ठाणे पालघर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button