करमाळा येथील तरुण पोलीस कर्मचाऱ्यांने केली आत्महत्या पोलीस दलात खळबळ
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख
करमाळा पोलीस स्टेशन येथे सध्या कार्यरत असलेल्या एका तरुण पोलीस कर्मचाऱ्यांने बुधवारी रात्री अकरा वाजता राहत्या घरी आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे आकाश गोते असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे गोते हे मूळचे घोळवेवाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असलेले पोलीस कर्मचारी होते सहा महिन्यापूर्वी करमाळा येथे सोलापूर वरून बदलून करमाळा पोलीस स्टेशन येथे आले होते
आकाश तोगे वय 26 असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे हे त्यांच्या पत्नीसह करमाळा येथे वास्तव्यास होते त्यांच्या पत्नी हे देखील करमाळा पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस कर्मचारी म्हणून ड्युटीवर आहे त्यांच्या पत्नी कर्तव्यावर असताना आकाश तोगे यांनी त्यांच्या राहत्या घरी बुधवारी रात्री अकरा वाजता गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली तोगे यांच्या मागे आई पत्नी एक मुलगी तसेच एक भाऊ असा परिवार आहे त्यांच्या निधनाने मात्र करमाळा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही याबाबत करमाळा पोलीस तपास करीत आहे त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी घोळवेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे