महाराष्ट्र

करमाळा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उद्या हळदी कुंकू व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी – अलीम शेख

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मकर संक्रात व रथसप्तमीच्या निमित्ताने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असल्याने शिवसेना संपर्क प्रमुख व जिल्हयाचे आधारवड प्रा. शिवाजी सावंत सर यांच्या नेतृत्वाखाली महिलासाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा कार्यक्रम किल्ला विभाग येथील खोलेश्वर मंदिरासमोरील सभागृहात ४ ते ६ या वेळेत होणार असून कार्यक्रम प्रसंगी महिला विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत तसेच केंद्र सरकारने राबविलेले ५ लाख पर्यंत मोफत उपचार (आयुष्यमान कार्ड) शिबिराचे आयोजन केले आहे. त्यामुळे महिलासाठी सदरचा कार्यक्रम म्हणजे आपल्या दीर्घायुष्यासाठी महत्त्वपूर्ण कार्यक्रम असणार असून जास्तीत जास्त महिलांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button