महाराष्ट्र

भारतीय जनता पार्टीची करमाळा शहर कार्यकारिणी जाहीर. सरचिटणीस पदी जितेश कटारिया तर महिला आघाडी शहराध्यक्ष पदी रेणुका राऊत

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते मा. ना.श्री देवेन्द्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष मा.आमदार चंद्रशेखर बावनकुळे , खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभा समन्वयक राजकुमार पाटील, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी आज कार्यकरिणी जाहीर केली.

त्यामध्ये सरचिटणीसपदी जितेश कटारिया, गणेश वाशिंबेकर यांची तसेच शहर उपाध्यक्ष पदी कपिल मंडलिक,चिटणीस पदी संजय जमदाडे , विवेक अवसरे ,महिला आघाडी शहराध्यक्षपदी रेणुका राऊत,व्यापार आघाडी शहराध्यक्ष पदी आदेश लूनिया ,व्यापार आघाडी सरचिटणीस पदी गोकुळ कुंभार,
वाहतूक आघाडी शहराध्यक्ष पदी तिरुपती ठोंबरे यांच्या निवडी करण्यात आल्या.

यावेळी घनशाम देवी,संजय घोरपडे,नूतन तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे ,मुन्ना हसीजा, अमरजीत साळुंखे,
प्रकाश क्षिरसागर,विनोद इंदलकर,अनिकेत राऊत,निलेश माने, दिपक देवकर यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.निवडी नंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button