महाराष्ट्र

आमदार संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक एक व दोन मधील विकास कामांसाठी एक कोटी बारा लाख निधी मंजूर,नगरसेवक संजय सावंत

करमाळा: प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा नगरपरिषदेला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान सन 2023- 24 या या आर्थिक वर्षासाठी आमदार संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा नगरपालिकेला प्रभाग क्रमांक एक व दोन मधील विकास कामांसाठी 1,12,99,354 रुपये मंजूर झाले असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय सावंत यांनी दिली

यावेळी सावंत म्हणाले की, प्रभाग क्रमांक एक व दोन मधील विकास काम गणेश बोरा घर ते पिंटू बेग घर रस्ता डांबरीकरण करणे ६,१७,७५० रुपये, गणेश बोरा घर ते पिंटू बेग घर गटार बांधकाम करणे ३१,८९,००२ रूपये, मोहल्ला गल्ली येथील विविध परिसरात गटार बांधकाम करणे ५०,२८,२६८ रुपये, सावंत गल्ली येथील सार्वजनिक शौचालय परिसर सुशोभित करणे २४,६४,३४४ रुपये मंजूर झाले असल्याची माहिती दिली नगरसेवक संजय सावंत यांनी विशेष पाठपुरावा करून हा निधी आणल्यामुळे त्यांचे शहरात कौतुक होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button