अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद चे १४ वे अधिवेशन संपन्न
प्रतिनिधी:- मायाताई सागर पाईकराव यवतमाळ
*यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका कार्यकर्ता पदाधिकारी यांची उपस्थिती*
जालना येथे अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदचे १४ वे अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनकार्यक्रमाला विविध राज्यासह अनेक जिल्ह्यातुन अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद चे पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन सीसीआयचे प्रधान सरचिटणीस देवेंद्र तिवारी यांनी केले होते AICWC द्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ग्राहक जागृती कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ कंजूमर कॉन्फेडरेशन
ऑफ इंडिया सी सी आय चे संस्थापक व प्रमुख डॉ अनंत शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.मुख्य अतिथी यांच्या मार्गदर्शनानंतर ग्राहकांच्या हक्क,व अधिकाराबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी भारतातून केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान व महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातुन अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे व सी सी आय चे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्षांनी पदाधिकारी कार्यकर्ता यांच्या अडचणी जाणून घेतल्या प्रसंगी कार्यक्रमाला सीसीआय च्या अनेक वरिष्ठ अधिकारी यांनी संबोधित केले.अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदचे प्रधान सरचिटणीस देवेंद्र तिवारी,AICWC अध्यक्ष विख्यात शिनॉय,शिल्पा रेड्डी सिसीआय उपाध्यक्ष शंभूराजे चक्रपाणी, सुश्री शिवापार्वती, शंकर चौरसिया,एम सुदर्शन, यवतमाळ जिल्ह्यातील अ.भा.ग्रा.क.प.पुसद तालुकाध्यक्ष मनीष दशरथकर, तालुका उपाध्यक्ष राजेश ढोले, पुसद कार्याध्यक्ष आकिब रिझवी अ.भा.ग्रा.क.प.दिग्रस तालुकाध्यक्ष विनोद गारुळे, सदस्य भीमराव खंदारे व इतर सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सीसीआयचे प्रधान सरचिटणीस देवेंद्र तिवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदेशाध्यक्ष प्रा.कल्यानकर व जालना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनटक्के यांनी मानले.