सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके आणि पालघर महसूल विभाग अधिकारी तलाठी किरण जोग यांची संयुक्त कारवाई…अवैध रेतीचा साठा नष्ट करून बोट केली जाळून…खाक
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640.
पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील वाढीव गाव खाडी किनारी एका बोटीमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेला रेतीचा साठा नष्ट करून ही बोट जाळून खाक करण्यात आली आहे.सदरची ही यशस्वी संयुक्त कारवाई केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता. के. शेळके यांच्या पथकासह पालघर महसूल विभागाचे अधिकारी तलाठी किरण जोग यांच्यामार्फत बुधवारी सकाळी करण्यात आली आहे.
केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील वाढीव गाव येथे खाडीकिनारी वैतरणा रेल्वे बीज क्रमांक 93 परिसरात एक रेतीने भरलेली बेवारस बोट आहे.अशी गोपनीय माहिती केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता.के.शेळके यांना बुधवार दिनांक 07 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी मिळतात त्यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह पालघर महसूल विभागाचे अधिकारी तलाठी किरण जोग यांना माहिती देऊन त्यांच्यामार्फत वाढीव गावचे उपसरपंच विनायक पाटील व अन्य पंचा समक्ष पंचनामा करून ही बोट ताब्यात घेऊन बोटीतील रेतीचा साठा खाडीत टाकून देऊन ही बोट जाळून खाक केली आहे.
सदरची यशस्वी संयुक्त कारवाई केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता.के. शेळके यांच्यासह केळवा पोलीस कर्मचारी व पालघर महसूल विभाग अधिकारी तलाठी किरण जोग यांच्यामार्फत करण्यात आली आहे..या बाबत पुढील तपास केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली केळवा पोलीस करीत आहेत.