विशेष
त्यागमूर्ती माता रमाई यांची 126 वी जयंती माळीनगर येथे सर्व महिलांनी एकत्र येऊन उत्साहात केली साजरी
प्रतिनिधी… रियाज मुलाणी
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
मो.99 21 500 780
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त माळीनगर येथे फुले- आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ माळीनगर ,
यांच्या वतीने माता रमाई यांच्या प्रतिमेला महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आजचा कार्यक्रम महिलांच्या हस्ते घेण्यात आला होता. रामामाता कॉलनीच्या पटांगणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी परिसरातील सर्व समाज बांधव यांच्यासाठी स्नेहभोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. याप्रसंगी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.