महाराष्ट्र
सिद्धार्थ नगर येथे माता रमाई यांची १२६ वी जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी… अकील कोरबु टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
मो नं 8600251162
त्यागमूर्ती माता रमाई यांची 126 वी जयंती देशभरात साजरी होत आहे याच अनुषंगाने आज माळशिरस तालुक्यातील सवतगव्हाण येथील सिद्धार्थ नगर येथे माता रमाईच्या प्रतिमेचे पूजन महिला भगिनींच्या हस्ते करुन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी वत्सलाबाई इंगळे, फुलाबाई ओव्हाळ, दसमाबाई खरे, अधिकाबाई खरात, रंजना शेळके, शांताबाई बनसोडे, लक्ष्मीबाई कांबळे, सुरेखा खरे, कल्पना माने, शोभा ओव्हाळ, वंदना ओहाळ, राणी खरे, वर्षा धाडवे, रोहिनी देखणे , संगीता क्षीरसागर, पुनम बनसोडे , साधना ओव्हाळ, आदी महिला वर्ग व समाज बांधव यांच्या उपस्थित अभिवादन करण्यात आले .