खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते विरार येथे संगणक कक्षाचे उद्घाटन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक – 7030516640
पालघर जिल्ह्यातील सेंट जोसेफ कला व वाणिज्य महाविद्यालय सत्पाळा विरार महाविद्यालयांचा वार्षिक स्नेहसंमेलन 2023-2024 व पारितोषिक वितरण सोहळा तसेच संगणक कक्ष उद्घाटन कार्यक्रम पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावीत यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे संजय जगताप विभागीय महासंचालक पनवेल, विषेश सन्मानिय जाॅन रूमाव ( सिनियर अॕड. ) यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी पार पडला.

यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार राजेंद्र गावीत यांनी सेंट जोसेफ कॉलेज मधील विद्यार्थी यांना शैक्षणिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी अत्याधुनिक युगातील सुसज्ज असे एकूण 40 संगणक आपल्या खासदार निधीतून उपलब्ध करून दिले आहेत.

सदर संगणक कक्षचे उद्घाटन खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार यांनी सांगितले की आधुनिक शिक्षण प्रणाली मध्ये संगणक यांचे विषेश महत्त्व व विध्यार्थीयांनी संगणक हाताळणी साठी उपयोगात मदत व्हावी या उद्देशाने सदर संगणक करून उपलब्ध देण्यात आले आहेत.



