शहर

सवना येथे जुगारावर कार्यवाही,दोघांवर गुन्हे दाखल दहा हजार आठशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी:-मायाताई सागर पाईकराव यवतमाळ

महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील सावना येथे महागाव पोलिसांनी धाड टाकून दोन आरोपी सह दहा हजार ८४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील सवना येथे वरळी मटका जुगार चालू असल्याची गुप्त माहिती महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना मिळाली असता पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली एपीसी वसीम शेख पोलीस कॉन्स्टेबल गजानन जाधव यांनी सवना येथील वरळी मटका दुकानावर कार्यवाही केली.

या कार्यवाहीतील आरोपी नामे मंगेश किसन माहुरे वय ३० वर्ष राहणार वेणी हा राजेश लिंगू देवधन वय ४० वर्षे राहणार सवना यांचे सांगण्यावरून वरळी मटका जुगार चालवीत होता. या दोघांवरही पोलिसांनी कारवाई करून नगद ८४० रुपये मोबाईल फोन अंदाजे किंमत दहा हजार रुपये वरळी मटक्याची साहित्य असा एकूण दहा हजार रुपये ८४० रुपयाचा मुद्देमात जप्त केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button