शहर

पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते विरार सत्पाळा आदिवासी एकता पाडा गावात भूमिपूजनाचा सोहळा संपन्न.

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी पालघर जिल्ह्यातील वसई तालुका येथील विरार सत्पाळा गावातील आदिवासी एकता पाडा रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

हा रस्ता गेले कित्येक वर्षापासून प्रलंबित होता. याबाबत सत्पाळा गावाचे सरपंच सौ.संगीता भंडार व ग्रामपंचायत सदस्यांनी या रस्त्याची मागणी पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे केली होती. या मागणीवर त्वरित अंमल बजावणी करून खासदार राजेंद्र गावित यांनी या रस्त्याला निधी मंजूर करून देऊन शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी या गावातील या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन केले
यावेळी या गावच्या सरपंच सौ.संगीता भंडार, ग्रामपंचायत सदस्य मनोज वरडा व आदिवासी एकता परिषदचे अध्यक्ष दत्ता सांबरे व या आदिवासी गाव पाड्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button