महाराष्ट्र

रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त मॅड फॉउंडेशन विक्रमगड येथे राम भजनाचे आयोजन

(ठाणे प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर (मो.9028305319) टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, श्री रामजन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमधील मॅड फॉउंडेशन येथे हिंदू सेवा संघ यांच्यावतीने श्री.प्रभूरामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळा चे अवचित्य साधून वेहेलपाडा येथील ह.भ. प.भजनी मंडळ यांचा श्री राम भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच तलासरी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. दशरथ भिका धनगर यांनी श्री. प्रभुरामचंद्र याच्या विषयी विचार मांडले. या कार्यक्रमचे आयोजन मॅड फॉउंडेशनचे संयोजक श्री. रमेश भोईर यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button