महाराष्ट्र

उमरड गावामध्ये सद्गुरु कृषि महाविद्यालय मिरजगाव येथील कृषीदुतांचे आगमन….

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

तालुक्यातील उमरड गावामध्ये श्री. संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सद्गुरु कृषि महाविद्यालय, मिरजगाव येथील कृषी दुतांचे आगमन झाले. यावेळी उमरड गावातील ग्रामस्थांनी कृषिदुतांचे उत्साहात स्वागत केले. ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदुत विविध विषयावर मार्गदर्शन, कृषि क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञानविषयक, शेतकरी गटशेती, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन व कृषि योजना याबद्दल विस्तार कार्य करणार आहेत.

यामध्ये प्रामुख्याने कृषिदुत शेटे विशाल, पवार केशव, झांबरे वैभव, वाबळे विराज, पुराणे गौरव , वाघुले प्रतिक हे विद्यार्थी सहभागी असून, हे सर्व विद्यार्थी उमरड गावामध्ये तीन महिने राहून विविध शेती विषयक प्रात्यक्षिके व उपक्रम राबवणार आहेत. याप्रसंगी कृषी दुतानी उपस्थित ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना उपक्रमाचा उद्देश व रूपरेषा समजावून सांगितली. यावेळी उमरड गावच्या सरपंचांनी गावची विस्तारित माहिती दिली व विद्यार्थ्याना सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देत सर्व गावकऱ्यांना देखील आवाहन केले. तसेच ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना विद्यार्थ्याच्या उपक्रमाला आवश्यक ते सहकार्य प्रशासनाकडून केले जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी उमरड गावचे सरपंच मा.श्री. लालासाहेब नामदेव पडवळे, उपसरपंच श्री.मुकेश बदे , ग्रामसेवक श्री अनिल भालेराव साहेब , कर्मचारी फत्तेखान सय्यद, उद्योजक अमोल मोहिते तसेच गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री.अंकुश कोठावळे (पोलिस पाटील), श्री. संपत कोठावळे, श्री.दिपक सोनवणे, गणेश पठाडे, यशराजे पाटील व प्रगतशील शेतकरी व उद्योजक श्री. गणेश चौधरी उपस्थित होते. या शैक्षणिक व कृषि आधारित सामाजिक उपक्रमासाठी कृषि दुतांना संस्थेचे संस्थापक डॉ. शंकरराव नेवसे, अध्यक्षा सौ. कल्याणीताई नेवसे, सचिव श्री. राजेंद्र गोरे, प्रशासन अधिकारी श्री. सखाराम राजळे, समन्वयक प्रा. सुरज जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे, कार्यक्रम अधिकारी प्रा. शिवम यादव आणि सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button