सफाळे माकुणसार येथे जिल्ह्यातील पहिल्या गोबरधन प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640
पालघर जिल्ह्यातील पहिल्या गोबरधन वीज निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन पालघर तालुक्यातील सफाळे येथील माकुणसार ग्रामपंचायत हद्दीत बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माकुणसार ग्रामपंचायतीने आपल्या विविध विकास कामांच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले.

या गोबरधन प्रकल्पातील तयार होणारी वीज ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांसाठी वापरण्यात येणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीचा होणारा पथदिव्यांवरचा खर्च बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी ओला कचरा आणि सुका कचरा विलगीकरण गावातील ओल्या कचऱ्याचा वापर करून वीज निर्मिती आणि कचरा व्यवस्थापन असा दुहेरी फायदा ग्रामपंचायतीला होणार आहे. तसेच या प्रकल्पातून निर्माण होणारा प्रवाही मिश्रीत घनकचऱ्यातून प्रत्येक दिवशी 100 किलो खतनिर्मिती देखील होणार असल्याचे या

ग्रामपंचायतीमार्फत सांगण्यात आले तसेच हा घनकचरा गोळा करण्यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रिक गाडीची मागणी या ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.पल्लवी पाटील आणि उपसरपंच आशिष मधुकर राऊत आणि सर्व सदस्य यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्याकडे केली असता त्यांनी या गावासाठी घनकचरा गोळा करण्यासाठी इलेक्ट्रिकल गाडी देण्याचे आश्वासन उपस्थित गावकऱ्यांना दिले आहे . यावेळी पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्य सीमा रावते व माकूणसार ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ.पल्लवी पाटील, उपसरपंच आशिष मधुकर राऊत, आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह या भागातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



