अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशनच्या ज्ञान वाटप उपक्रमाच्या माध्यमातून डहाणू येथील 500 आदिवासी शेतकऱ्यांचे सक्षमीकरण

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा
प्रतिनिधी विजय घरत.
भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.
अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशनने डहाणू तालुक्यातील अदाणी डहाणू थर्मल पावर स्टेशनच्या परिसरातील धामणगाव, गगनगाव, आंबेसरी,जामखेड, चरीकोटबी, डेहणेपळे,सरावली, आगवन आणि सोगवे या गावातील 500 आदिवासी शेतकऱ्यांचा एक भव्य मेळावा आयोजित केला होता.जामशेत गावाबाहेर पार पडलेल्या या उपक्रमातून शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी पद्धतीत सुधारणा करण्यास व उत्पन्न वाढवण्यास मदत करणारी मौल्यवान माहिती आणि संसाधने पुरवण्यात आली व या उपक्रमातून अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशन ज्यांना सेवा पुरवितो त्या समुदायाच्या शाश्वत विकासाप्रती आमची दृढ बांधिलकी दर्शवितो वाडी-शेती हा शेतकऱ्यांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीचा आणि पर्यावरण विषयी धुरिण तत्त्वाची जोपासना करण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे. असे या मेळाव्यात बोलताना अदाणी फाउंडेशनचे प्रवक्ते म्हणाले. विशेष म्हणजे या मेळाव्यामध्ये प्रमुख सरकारी संस्थांच्या प्रतिनिधीनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.



