शहर

समाज कल्याण सभापती मनीषा निमकर यांच्या हस्ते सफाळ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.

भ्रमणध्वनी क्रमांक -7039516640

पालघर तालुक्यातील उंबरपाडा-सफाळे ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा सोहळा सोमवार 08 जानेवारी 2024 रोजी सकाळी पार पडला.

यावेळी समाज कल्याण सभापती मनीषा निमकर यांच्या निधीतून ४१ लाखाचा निधी मंजूर करून विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.उंबरपाडा- सफाळे ग्रामपंचायत हद्दीतील रोडखड अंतर्गत गटार करणे, कुलाई रोड अंतर्गत पाण्याच्या टाक्या बसवणे, नंदाडे येथे वीहीर बांधणे, सफाळे गाव अंतर्गत रस्ता करणे, सरतोडी अंतर्गत रस्ता करणे, नंदाडे तलावातील गाळ काढणे, गेरू ओहोळ येथील बंधारा दुरुस्ती करणे अशा अनेक कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी सफाळे उंबरपाडा , सरपंच तनुजा कवळी, उपसरपंच राजेश म्हात्रे , ग्रामपंचायत सदस्य राजेश घरत, अमित सातवे, दर्शन बाबर, संजना सुतार, शकिला शेख, विद्या रावते, सुनंदा शेलार तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button