कर्तव्यदक्ष पालघर रेल्वे पोलीस सिद्धार्थ सुगंधे यांनी प्रवाशाची हरवलेली बॅग दिली शोधून
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा
प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
विरार येथून विरार-बोईसर असा पश्चिम रेल्वेचा प्रवास करताना आपली बॅग व दोन किमती मोबाईल लोकलमध्ये विसरलेल्या प्रवाशाला त्याची बॅग व दोन मोबाईल सुखरूप पणे शोधून परत देणारे कर्तव्यदक्ष रेल्वे पोलीस सिद्धार्थ सुगंधे सह पालघर रेल्वे पोलिसांचे या प्रवाशाने आभार व्यक्त केले आहेत. रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी विरार ग्लोबल सिटी येथे राहणारे (40) वर्षीय शेख अब्दुल कादर मोहम्मद हनीफ हे विरार येथून 1.20 च्या विरार डहाणू लोकल मधील लगेच डब्यामध्ये बसून बोईसर येथे जात होते. बोईसर स्टेशन आल्यावर ते रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते आपली ब्राऊन रंगाची बॅग व त्यामध्ये असलेले दोन किमती मोबाईल विसरले आहेत. त्यांनी बोईसर रेल्वे स्टेशन मास्तर यांना तक्रार दिल्यावर त्यांनी त्वरित डहाणू रेल्वे स्टेशन यांच्याशी संपर्क साधून बॅग शोधण्याचे आदेश दिले होते.या आदेशाचे पालन करून डहाणू रेल्वे स्टेशनवर ड्युटी बजावत असलेले बक्कल नंबर 1117 रेल्वे पोलीस शिपाई सिद्धार्थ सुगंधे यांनी ही लोकल डहाणू रेल्वे स्टेशनवर पोचल्यावर या बॅगचा शोध घेऊन त्यांच्या बॅग मधील दोन मोबाईल सह त्यांची बॅग त्यांना संपर्क साधून त्यांना दुपारी डहाणू रेल्वे स्टेशन येथे बोलून त्यांची बॅग व दोन मोबाईल सुखरूप पणे परत दिले आहेत. याबाबत या प्रवाशांनी रेल्वे कर्तव्यदक्ष पोलीस शिपाई सिद्धार्थ सुगंधे सह पालघर रेल्वे पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.