श्री समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित आगरवाडी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी-विजय घरत.
भ्रमणध्वनी क्रमांक- 7030516640
श्री समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आगरवाडी रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त श्री समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित आगरवाडी व भक्ती वेदांत रुग्णालय आणि संशोधन मिरारोड मुंबई यांच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम आगरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये रविवार दिनांक 03 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते . या शिबिराचे उद्घाटन भक्ती विधान हॉस्पिटलचे डॉक्टर लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले तर पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद वामन पाटील व ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या शिबिराला सुरुवात करण्यात आली .
या शिबिरामध्ये या भागातील नागरिकांनी सहभाग घेऊन डोळ्यांची पूर्ण तपासणी तसेच अल्पदरात चष्मे व जनरल फिजिशियन सल्ला, बीपी, मधुमेह या आरोग्य सेवेचा लाभ घेतला. याप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद वामन पाटील, व संचालक उपाध्यक्ष दत्तात्रेय हरिभाऊ पाटील तसेच कार्यवाह किसन शिणवार किणी व
या पतसंस्थेचे संचालक भगवान शांताराम वझे, काशिनाथ मंगळ्या गावड, विकास केशव गावड, शंकर तुमडे, हेमंत पाटील, अशोक पाटील, सौ.अश्विनी पाटील, सौ.रागिनी पाटील, दत्तात्रेय गावड, दीपेश पाटील, जगदीश पाटील, किशोर पाटील यांच्यासह सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.