वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समितीने घेतली बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा
प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर विरोधी भूमिकेच्या अनुषंगाने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समितीने रविवार दिनांक 3 डिसेंबर रोजी घेतली .या बैठकीच्या चर्चेत बहुजन विकास आधाडीची भूमिका वाढवण बंदर विरोधात ठाम असून गेल्या आठवड्यात झालेल्या जे.एन.पी.टी व जिल्ह्यातील सर्व आमदार यांच्या संयुक्त बैठकीत मी स्वतः संजय सेठी यांना प्रश्न उपस्थित करून ठाम विरोध दर्शविला असे ते युवा संघर्ष समितीशी चर्चा करताना बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर म्हणाले. तसेच सर्व आमदारांना JNPA च्या बैठकीत त्यांनी रोख ठोक सांगितले कि निवडून यायचे असेल तर बंदराला विरोध करा अन्यथा घरी बसा. आमदारा कडून लवकरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला जनसुनावणी पुढे ढकलण्याचे पत्र दिले जाणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे . यावेळी या बैठकीला शशांक पाटील, मिलिंद अक्रे, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे देवेंद्र तांडेल, वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समितीचे मिलिंद राऊत, अनिकेत पाटील, लोकप्रहार सेनेचे स्वप्निल तरे, विजय भाऊ वझे उपस्थित होते.