विशेष

पालघर जिल्ह्यातील जव्हार रामनगर येथे केशव सृष्टीच्या बांबू प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.

भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

केशव सृष्टी ग्रामविकास योजनेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात केशव सृष्टी या संस्थेने ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल मदत करण्यास हातभार लावणार आहे.जव्हार तालुक्यातील रामनगर येथे गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या बांबू प्रकल्प भूमिपूजनाच्या कार्यक्रमाने स्थानिक आदिवासी महिलांना आपल्या गावातच रोजगाराचे साधन उपलब्ध होणार असल्याने या महिलांच्या हाताला काम मिळणार आहे.ग्रामीण आदिवासी भागातील महिलांना रोजगाराच्या माध्यमातून त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी संस्थेने रामनगर येथे बांबूची लागवड करून त्याच ठिकाणी बांबू महिला उद्योग प्रकल्पाचे भूमिपूजन करून या प्रकल्पात सद्यस्थितीत जवळपास 19 एकराच्या जागेमध्ये विविध पाच जातींच्या 50 हजार बांबुंची लागवड झाली असून बांबू उद्योग समूहाला येत्या दोन वर्षात प्रत्यक्ष बांबू उद्योग प्रकल्प चालू करण्याचा मानस केसंसृष्टीने आपल्या अंगाशी बाळगला आहे.

दरम्यान स्थानिक महिलांना उद्योगासाठी लागणारा कच्चामाल माफक दरात आपल्या गावातच उपलब्ध होणार असल्याने त्यांना या उद्योगातून मिळणाऱ्या नफ्यातही वाढ होऊन महिला वर्ग या उद्योगाकडे वळून आपला रोजगार आपल्या गावातच निर्माण करतील व होणारे पारंपरिक स्थलांतर थांबेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.या बांबू प्रकल्प उद्योगातून दिवाळीत लागणारे आकाश कंदील,सुबक राख्या,विविध प्रकारचे ट्रे,सुशोभीकरणाच्या आकर्षक वस्तू,अनेक प्रकारच्या ट्रॉफी यासारख्या पूर्णपणे नैसर्गिक वस्तू तयार करून महिला वर्गाला अर्थार्जनाची प्राप्ती होणार आहे.सध्याच्या स्थितीत जवळपास 250 पेक्षा जास्त कुटुंबात या प्रकल्पच्या माध्यमातून विविध वस्तू तयार करण्यातचे महिलांनी प्रशिक्षण घेऊन प्रत्यक्षपणे महिला या वस्तू बनवीत आहेत. या भूमिपूजन सोहळ्यात भांगरेपाडा येथील तारपा नृत्य व हाडे येथील टिपरी नाच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

केशव सृष्टीच्या या लाभदायी प्रकल्पामुळे ग्रामीण महिलांना भविष्यात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन त्या स्वयंपूर्ण होतील.या बांबू प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याला बांबू उद्योग समूहाचे गौरव श्रीवास्तव,केशव सृष्टी ग्रामविकास प्रकल्पाचे सर्वेसर्वा विमलजी केडिया,मुंबई युवा जव्हार केंद्राच्या पालक प्रमिलाताई कोकड,बांबू महिला कंपनीच्या डायरेक्टर नमिता भुरकुड व सहकारी तसेच उद्योग समूहात सहभागी असलेले सहकारी त्याचप्रमाणे प्रत्यक्षपणे बांबू पासून वस्तू बनवणाऱ्या प्रशिक्षित शेकडोंच्या संख्येने महिला वर्ग ही उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button