अँड प्रा.गोवर्धन जगन्नाथ चवरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्राहक संरक्षणाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी निवड सर्व स्तरातून होत आहे अभिनंदन
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
मा. देशाचे शेतकऱ्यांचे राजे थोर नेते राष्ट्रवादी संस्थापक अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार साहेब प्रदेश अध्यक्ष मा.जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे प्रदेश अध्यक्ष ग्राहक संरक्षणाचे माजी मंत्री मा.सुर्यकांत आप्पा गवळी साहेब मा.जिल्हाअध्यक्ष श्री काकासाहेब साठे यांचे मार्गदर्शनानुसार व शिफारशीने आणि आशीर्वादाने मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात 22-11-2023 रोजी अँड प्रा.गोवर्धन जगन्नाथ चवरे पाटील करमाळा जि.सोलापूर यांची महाराष्ट्र राज्य काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण प्रदेश सरचिटणीस पदी पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे करमाळा तालुका राष्ट्रवादी पार्टी व सोलापूर जिल्हा अध्यक्ष काकासाहेब साठे यांनी त्यांचे खास अभिनंदन केले अँड प्रा.गोवर्धन चवरे पाटील हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर त्यांच्या धडाडी व वक्तृत्व पाहून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रचार मुलुख मैदान तोफेचा वापर केला जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी मुंबई येथे या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस श्री रवींद्र पवार साहेब होते माजी मंत्री सुर्यकांत आप्पा गवळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा मतदारसंघात निवडणुका लढवणार आहे तर 18 ते 19 लोकसभा मतदारसंघात निवडणुका लढविणार आहे याबाबत सविस्तर चर्चा झाली.
ॲड प्रा.गोवर्धन चवरे पाटील यांच्यावर अहमदनगर उस्मानाबाद तसेच बीड या तीन जिल्ह्याची जबाबदारी पक्ष निरीक्षक म्हणून माजी मंत्री सुर्यकांत आप्पा गवळी यांनी दिली आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातुन प्रा . गोवर्धन चवरे पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.. प्राध्यापक चवरे यांनी आजपर्यंत विविध सामाजिक कार्यात याशिवाय आंदोलनात भाग घेऊन लोकांच्या अडीअडचणी सोडविण्या मोठी कामगिरी बजावली आहेत्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षण समितीच्या राज्य सरचिटणीस पदी वरिष्ठांनी निवड केली आहे
त्यांच्या निवडीचे करमाळा माढा मतदारसंघातून जोरदारपणे स्वागत होत आहेचौकट घेणेमी माझ्या पदाचा वापर सर्वसामान्य नागरिक यांच्या अडीअडचणी सोडवण्या साठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे प्राध्यापक चवरे यांनी बोलताना सांगितले