दसुर येथील हिंदू-मुस्लीमांच्या ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या चाँद साहेब यांच्या दर्गाह कडे दुर्लक्ष

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
माळशिरस तालुक्यातील दसुर येथील चाँद साहेब यांची दर्गा येथील सत्ताधाऱ्याकडून दुर्लक्षित झाले असून येथे येणाऱ्या अनेक भाविक भक्तांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे येथील स्थानिक सत्ताधाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी येथे येणाऱ्या भाविक भक्ताकडून होत आहे.

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे व सर्वांना समतेचा संदेश देणारे चाँद साहेब यांचे दुर्मिळ ठिकाण दसुर येथे वसले आहे. अगदी सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून श्रद्धा असणारे अनेक हिंदू मुस्लिम भाविक भक्त त्या ठिकाणी गुरुवारी पाणी घालण्यासाठी येत असतात. गुरुवारी पाणी घालणे हे पवित्र मानले जाते त्याचबरोबर या ठिकाणी बोकडाचा बळी देऊन शिधा करण्याची देखील प्रथा आहे. पण हे जुने ठिकाण असताना सुद्धा अजून येथील सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी जाणारा रस्ता करता आला नाही. अगदी पाचशे मीटरवर गाड्या थांबवूनच या ठिकाणी जावे लागते. दुचाकी स्वारांना ओबडधोबड रस्ता असल्याने जीव मुठीत घेऊन जावे लागते यादरम्यान ओढा देखील आहे तिथेही खूप मोठी अडचण आहे. दर्गा जवळ गेल्यानंतर ब्लॉक वगैरे काहीही टाकले नसल्याने भाविक भक्तांची खूप मोठी गैरसोय होताना आहे. महिलांना प्रदक्षिणा मारताना काट्याकुट्यातून प्रदक्षिणा मारावा लागतो. सदर ठिकाणी पाण्याची कुठलीच सोय असल्याने पाणी भावीक भक्तांना घरूनच घेऊन यावे लागते. उन्हाळ्यात या स्थळी कसेबसे जाता तरी येते मात्र पावसाळ्यात या ठिकाणी जाण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागते त्यामुळे इतका हा जुना दर्गा असून देखील आजपर्यंत ग्रामपंचायत मधील सत्ताधाऱ्यांनी याकडे का दुर्लक्ष केले आहे असा सवाल या ठिकाणी येणाऱ्या परगावच्या भाविक भक्ताकडून व्यक्त केला जात आहे. निधी तर वरिष्ठ पातळीवरून भरपूर येतो आहे मग इथे भाविक भक्तांच्या सोयी सुविधेसाठी ग्रामपंचायत का पुढाकार घेत नाही असा प्रश्नही भाविक भक्तांच्या मनाला पडला आहे.
त्यामुळे तात्काळ या प्रकरणी वरिष्ठ नेते मंडळी व अधिकाऱ्यांनी लक्ष घालून असंख्य भाविक भक्तांना न्याय द्यावा अशी मागणी होताना दिसत आहे.



