अकलूज (समतानगर) येथे कत्तलीसाठी जमा केलेले 35 जनावरांची पोलिसाकडून सुटका व संबंधितावर गुन्हा दाखल

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
कत्तलीसाठी वाहतूक करीत असलेली व जमा केलेली जर्शी गायी व गोवंशीय लहान वासरे तसेच क्रुर वागणुक देत असलेले १९ म्हेसवर्गीय जनावरांची सुटका करून कारवाई केलेबाबत अकलुज पोलिस स्टेशन मध्ये तिघा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या बाबत अकलुज पोलिसाकडून मिळलेली माहिती अशी कि श्री राम नवमी निमित्त अकलुज शहरात शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना बातमी मिळाली की, समतानगर अकलुज येथे कत्तलीसाठी जमा केलेली गोवंशीय व म्हैसवर्गीय जनावरे एका शेडमध्ये असुन त्यातील जनावरे अमानुषपणे, निर्दयीपणे चारही पाय व मान दोरीने वाहनाच्या साईडच्या लोखंडी अँगल ला बाधून कोंबुन भरत आसल्याची माहिती मिळाल्याने आम्ही स्टाफसह सदर ठिकाणी जावून पाहिले असता

एक महिद्रा पिकअप वाहन नंबर MH-24 AU 1775 या वाहनाचे पाठीमागील हौदात काळ्या पाढ-या रंगाच्या 5 जर्सी गाय क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने कोंबुन त्यांना वेदना होईल अशा परिस्थीतीत कमी रूंदीच्या जागेत हालचाल करता येणार नाही तसेच त्यांना सदर वाहनात चारा पाणी व औषधाची कोणतीही सुविधा नसताना त्यांचे अमानुषपणे, निर्दयीपणे चारही पाय व मान दोरीने वाहनाच्या साईडच्या लोखंडी अँगलला बांधुन कोंबुन भरलेले दिसले.
सदर पिकअपचे बाजुस असलेल्या पत्राचे कंपाऊंडमध्ये काळया पांढऱ्या रंगाच्या जर्सी गाय जातीची ३० लहान वासरे व 4 गिर गाय जातीचे वासरे, 1 काळे रंगाची देशी गाय असे एकुण ३५ जनावरे बांधलेली होती. तेथे काळ्या पांढऱ्या रंगाच्या जर्सी गाय जातीची 0३ वासरांचे तोंडाला बांधलेले होते तसेच सदर ठिकाणी म्हैसवर्गीय १९ लहान रेडे विना चारा पाणी डांबुन ठेवलेले होते.

पिकअप वाहनचे चालक रशिद रमजान कुरेशी वय 40 वर्ष .रा .पापनस ता. माढा जि. सोलापुर तसेच जनावरांचे मालक सादीक कुरेशी व जागा मालकाचे नाव निहाल कुरेशी दोघे रा.अकलुज यांना ताब्यात घेवुन त्यांचे विरूध्द अकलुज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 199/ 2023 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा)अधि. 1995 चे कलम 5 (अ) 5 (ब) 9 (ब) 11
सह. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कायदा 1960 कलम 12 (1 ), 99(9)(a), 11(1)(, f)
11(1) (h), 11(1)(i) तसेच प्राण्यांचे परिवहन नियम 1978 चे कलम 47,54,56, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधिक्षक हिंम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी,बसवराज शिवपुजे अकलुज विभाग, अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस हवालदार विक्रम घाटगे, शिवकुमार मदभावी, विशाल घाटगे, अमोल बकाल, समिर पठाण, पोलीस कॉस्टेबल नितीन लोखंडे, चालक पोलीस नाईक रविराज नागरगोजे यांचे पथकाने कारवाई केली असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार अमोल बकाल हे करीत आहेत.