शहर

सेतू कार्यालय आजपासून कायमस्वरूपी बंद!

लक्ष्मीकांत कुरुडकर. अकलूज(प्रतिनिधी)

जातीचे दाखले असो किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र देणारे सेतू कार्यालय १ एप्रिलपासून कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. नागरिकांना यापुढे महा-ईसेवा केंद्रातून सुविधा दिल्या जातील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) चालविण्याची मुदत दि. ३१ मार्च २०२३ रोजी संपुष्टात आली आहे. जिल्हा सेतू समिती, सोलापूर यांच्यामार्फत सोलापूर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र (महाई सेवा केंद्र) स्थापन करण्यात आलेली आहेत. हे केंद्रे सध्या कार्यरत आहेत. यापुढे नागरिकांनी आपल्या रहिवाशी भागात कार्यरत असलेल्या महा ई सेवा केंद्रामार्फत विविध दाखले व सेवा सुविधांचा लाभ घ्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
21:38